26 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeEntertainmentअमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग, ट्विटद्वारे दिली माहिती

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग, ट्विटद्वारे दिली माहिती

एकदा कोरोना संसर्ग होऊन गेल्याने ते विशेष काळजी घेत होते.

अमिताभ बच्चन यांनी पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना यापूर्वी जुलै २०२० मध्ये कोरोना झाला होता. आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीच्या १४ व्या पर्वाचं निवेदन करण्याचं काम करत आहेत. सध्या त्या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु होतं.

अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं निवेदन करत आहेत. त्यामुळं त्यांना करोना संसर्ग नेमका कसा झाला हे कळू शकलेल नाही. अमिताभ बच्चन हे कायमच स्वत: च्या प्रकृतीची काळजी घेत असतात. ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी देखील पूर्ण प्रयत्नशील असतात. कोरोना संसर्गाच्या लाटेमध्ये देखील त्यांनी विशेष काळजी घेतली होती. मात्र, त्यांना दोन वर्षापूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. एकदा कोरोना संसर्ग होऊन गेल्याने ते विशेष काळजी घेत होते. अमिताभ बच्चन यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला, त्यावेळी सुरक्षितता म्हणून ते मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल झाले होते. कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीसोबत इतर प्रोजेक्टवर देखील काम करत आहेत. अजय देवगणच्या रनवे-३४ चित्रपटात ते काम करत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ब्रह्मास्त्र चित्रपटात देखील ते चाहत्यांना पाहायला मिळतील. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते नियमितपणे वेगवगळ्या पोस्ट करत असतात. त्याप्रमाणं त्यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे चाहत्यांना दिली आहे. बच्चन यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular