ठाण्यातील शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर येत आहे. यावर्षीचा बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट १३ मे २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचा ‘ प्रोमो’ लॉन्च कार्यक्रम अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच राज्याचे नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे सुपरस्टार सलमान खानसह जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, निखिल द्विवेदी, भाग्यश्री आणि इतर अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते.
धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे यांनी त्यांच्या लोकप्रिय महिंद्रा आर्माडा कारमध्ये जीव गमावला होता. मुंबईतील लोकांसाठी ही कार म्हणजे देखील आदराचं प्रतीक आहे. या कारची ते नेहमीच पूजा करत असत. धर्मवीर या चित्रपटाच्या ‘ प्रोमो’ वेळी देखील ही विंटेज कार उपस्थित होती. चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील अभिनेता प्रसाद ओक याच कारमधून ‘ धर्मवीरच्या प्रोमो लॉन्चच्या कार्यक्रमाला पोहोचला होता. या भव्य प्रवेशानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनीही मंचावर उपस्थित राहून या चित्रपटाच्या टिमला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी, “एकनाथ, मी मनापासून सांगतो, तुम्ही आणि तुमच्या टीमने खूप छान काम केले आहे. चित्रपट बनवणे ही एक गोष्ट आहे, पण अशा विषयावर चित्रपट बनवणे आणि हे काम पुढे नेणे. “हे खरच खूप अभिमानास्पद आहे.“ असे उदगार त्यांनी काढले.
एकनाथ शिंदे म्हणाले, “धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे याच्या जीवनावरील हा चित्रपट शहरात आणि जगभरातील आपल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे”. दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई यांनी दिघेजींवर चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर हा चित्रपटावर काम करण्यास सुरूवात केली. सुरूवातीलाच या चित्रपटाचा टीझर आणि गाणी खूपच लोकप्रिय झाली. दिघेजींना कधीही न भेटून ही भूमिका उत्तमरित्या साकारणारा अभिनेता प्रसाद ओकचेसुद्धा काम सुद्धा विशेष कौतुकास्पद आहे.