27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriजिल्ह्यातील आजपासून मिळणार आनंदाचा शिधा

जिल्ह्यातील आजपासून मिळणार आनंदाचा शिधा

अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटुंब, शेतकरी आत्महत्याग्रस्त, दारिद्र्यरेषेवरील तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणार आहे.

जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना या वेळीही गणेशोत्सव आणि दिवाळीला शासनाकडून आनंदाचा शिधा मिळणार आहे. १०० रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल मिळणार आहे. अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटुंब, शेतकरी आत्महत्याग्रस्त, दारिद्र्यरेषेवरील तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणार आहे. जिल्ह्यातील प्राधान्य तसेच अंत्योदय, पात्र अशा एकूण २ लाख ६४ हजार २४१ शिधापत्रिकारकांना हा लाभ दिला जाणार आहे. गणेशोत्सवासाठीचा शिधा १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत तर दिवाळीचा शिधा १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

सध्या चिपळूण तालुक्यासाठी ४१ हजार १८३ किलो रवा प्राप्त झाला आहे. शासनाने गुढीपाडव्याच्या कालावधीत पहिल्यांदा आनंदाचा शिक्षा देण्याची घोषणा केली होती; मात्र वेळेवर तो पात्र कार्डधारकांपर्यंत न पोहचल्याने विरोधकांनी शासनावर टीका केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा शिधा प्राप्त झाला. तेव्हा या योजनेचा लाभ ९९ टक्के लोकांना मिळाला होता. या वेळीही शासनाने गणेशोत्सव आणि दिवाळीला पात्र कुटुंबांना आनंदाच्या शिधा देण्याची घोषणा केली आहे. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अशा दोन गटांतील २ लाख ६४ हजार २४१ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular