25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriआदेश मोडून सुरु केलेले गॅस टर्मिनलचे काम संतप्त ग्रामस्थांनी रोखले

आदेश मोडून सुरु केलेले गॅस टर्मिनलचे काम संतप्त ग्रामस्थांनी रोखले

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम सुरु करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ग्रामस्थ संतापले.

शासनाचा आदेश मोडून आदेश मोडून जिंदाल कंपनीने गॅस टर्मिनलचे काम सुरु केल्याचे कळताच परिसरातील शेतकऱ्यांनी / ग्रामस्थांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत हे काम बंद पाडले. गावकऱ्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. याबाबत अधिक वृत्त असे की, जयगड परिसरात गॅस टर्मिनल उभारण्यास परिसरातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. लोकवस्तीजवळ गॅस टमिनल उभारु नये अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. असे असतानाही या गॅस टर्मिनलचे काम सुरु झाल्याचे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी काम बंद पाडले. त्यानंतर याबाबतचा विचारण्यासाठी जाब कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावले. या कामाशी आमचा काही संबंध नाही असे संबंधित अधिकाऱ्यांनी जाब विचारणाऱ्या ग्रामस्थांना सांगितले. यावरुन बरीच वादावादी झाली.. गावाकऱ्यांनी याबाबत स्थानिक पोलीस स्थानक व महाराष्ट्र सागरी मंडळ जयगड येथे व्रकार नोंदवली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई यांनी गॅस टर्मिनस चे काम तात्काळ थांबवले आहे. तरी देखील बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम सुरु करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ग्रामस्थ संतापले. स्थानिक लोकांचा विरोध असताना, शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी नसताना जिंदाल कंपनी मनमानी करून नांदिवडेच्या माथ्यावर वर लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. आधीच कोळशाची धूळ आणि राख याचा स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. श्वसनाच्या वाटे कोळशाची धूळ व राख याने लोक आजारग्रस्त झालेले आहेत. मात्र त्याचा कोणताही विचार न करता अशा पद्धतीने गॅस’ टर्मिनल उभारण्याचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. शासनाने या सर्व गोष्टीची दखल घेत लवकरात लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतर करावा आणि कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular