29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraबडतर्फीची कारवाई मागे घेतली जाणार नाही – अनिल परब

बडतर्फीची कारवाई मागे घेतली जाणार नाही – अनिल परब

आमच्यावर कोणताही कारवाई केली जाणार नाही अशा संभ्रमात कामगार आहेत  अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संप काळातील एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. सरकार म्हणून हातावर हात ठेवून आम्ही बसून राहू शकत नाही. जशी तुमची बाजू आहे तशीच जनतेची बाजू लक्षात घेणे सुद्धा आम्हाला बंधनकारक आहे. त्यामुळे, बडतर्फीची ही कारवाई ताबडतोब मागे घेतली जाणार नाही असं अनिल परब यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट सांगितले आहे.

बडतर्फची कारवाई झाली की त्याला पुन्हा एक प्रक्रिया असते. आम्ही लगेच बडतर्फीची कारवाई मागे घेऊ शकत नाही. कारण आम्ही कारवाया मागे घेत असून सुद्धा कामगार कामावर हजर होत नाहीत. आमच्यावर कोणताही कारवाई केली जाणार नाही अशा संभ्रमात कामगार आहेत  अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

परबांनी विधानसभेत केलेल्या या वक्तव्यावर गेल्या दोन दिवसांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कामावर परतले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी २३ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्याने जे एसटी कर्मचारी अद्यापही कामावर परतले नाहीत, त्यांच्यावर आजपासून पुन्हा एकदा करवाईचा बडगा उगारण्यात येणार असून त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे.

आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी, काहीतरी तोडगा काढू. चर्चेसाठी आम्ही तयार असून, राज्य सरकारनं आम्हाला बोलवावं, अशी भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधीमंडळात बडतर्फच्या कारवाया मागे घेणार नाही असे वक्तव्य केलेले. या पार्श्वभूमीवर संपावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, मात्र अजूनही विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आम्हालाही या मुद्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील दीड महिन्यापासून, प्रथमच आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सामंजस्याची भूमिका घेतल्याचे ऐकीवात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular