29.8 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeDapoliअनिल परब यांच्या अडचणीत वाढ, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची टिम मुरूडमध्ये दाखल

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची टिम मुरूडमध्ये दाखल

या टिममध्ये चैन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी परिवहन मंत्री व जिल्हयाचे माजी पालकमंत्री अनिल परब यांचे हे रिसॉर्ट असल्याचा आरोप करून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडेही तक्रार केली होती. गेल्या वर्षीही याच कालावधीत पर्यावरण मंत्रालयाच्या टीमने या रिसॉर्टची पाहणी केली होती. पाच दिवसांपुर्वी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी अनिल परब रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू असे ट्वीट केले होते.

अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसाॅर्टकडुन सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.याप्रकरणी अनेक आरोप सोमय्या यांनी केले आहेत. ही टिम साई रिसाॅर्ट प्रमाणे सी कोच रिसाॅर्टची देखिल करतेय अशी प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची सहाजणांची टिम मुरुडमधल्या साई रिसाॅर्ट परिसरात गुरुवारी १४ जुलै रोजी दिवसभर पाहणी करण्यासाठी दाखल झाली होती. काल रात्री नऊ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती येथील प्रशासकीय कार्यालयातही याप्रकरणी कागदपत्रांची चौकशी सुरू होती. या केंद्रीय पाहणी पथकाकडुन गुरुवारी रात्रीच सगळ्याचा पाहणी अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या पथकाकडून येथील सुरू बन,सेफ्टी टॅंक आदीची पाहणी या केंद्रीय पथकाकडून करण्यात आली आहे

या टिममध्ये चैन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. पर्यावरणाच्या हानीसंदर्भात अत्तापर्यंत काय कारवाई झाली याची या टिमकडून चौकशी सुरू आहे. सहा जणांच्या टिमकडून ही चौकशी सुरू आहे. गुरुवारी मुरुड येथील साई रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊन या टिमने पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांत,तहसीलदार,सर्कल तलाठी हे महासुलचे अधिकारि व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular