24.2 C
Ratnagiri
Monday, January 5, 2026
HomeMaharashtraठरलं तर मग ! आज दुपारी १२ वा. च्या मुहुर्तावर घोषणा

ठरलं तर मग ! आज दुपारी १२ वा. च्या मुहुर्तावर घोषणा

पोस्टमधून ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याचा मुहूर्त समोर आला आहे.

गेल्या ४-५ महिन्यांपासून संपुर्ण महाराष्ट्राला ज्या घोषणेची प्रतिक्षा आहे ती घोषणा अखेर बुधवारी २४ डिसेंबरला दुपारी १२ वा. होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. याचा अर्थ बुधवारी दुपारी उद्धव आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेवून शिवसेना-मनसे युतीची घोषणा करतील असा लावला जात आहे. वरळी येथील हॉटेल ब्ल्युसी येथे ही पत्रकार परिषद २४ डिसेंबरला दुपारी १२ वा, होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीगाठी, कौटुंबिक कार्यक्रम मिध्ये उपस्थिती, सण-उत्सवावेळी सहकुटुंब दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या जवळपास २० वर्षांपासून दोन स्वतंत्र वाटांनी मार्गक्रमण करणारे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा पाहायला मिळत होत्या. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शक्यता प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याची शक्यता अधिक गडद झाली होती. अखेर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी एक्सवर केलेल्या सूचक पोस्टमधून ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याचा मुहूर्त समोर आला आहे.

काय आहे पोस्टमध्ये? – संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे व उद्धव ठाकरेंचा पुष्पगुच्छ देतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर राऊतांनी फक्त एक वेळ दिली आहे. उद्या १२ वाजता ! उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या फोटोसह ही वेळ दिली असल्यामुळे उद्या अर्थात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचं मानलं जात आहे. त्याचवेळी, उद्या फक्त युतीची घोषणा केली जाणार असून नंतर टप्प्याटप्प्याने जागावाटप जाहीर केलं जाईल, अशीही शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

फक्त घोषणा बाकी ! – संजय राऊतांकडून सातत्याने राज दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे व उद्धव ठाकरे या भावांमध्ये युती निश्चित झाल्याचे दावे केले जात होते. मात्र, त्याचवेळी युतीबाबत दोन्ही पक्षाच्या इतर नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. त्यामुळे नेमकी दोघांमध्ये युती होणार की नाही? असल्यास घोषणा कधी होणार? नेमकी चर्चा कोणत्या मुद्यांवर अडली आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर या सर्व चर्चावर बुधवारी पडदा पडणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular