26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeKhedगणेशोत्सवासाठी रेल्वेच्या आणखी २० फेऱ्या

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या आणखी २० फेऱ्या

मध्य-कोकण-पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या फेऱ्यांची संख्या २७८ पर्यंत पोहोचली आहे.

उत्सव काळातील गर्दी विभागण्यासाठी नव्या अतिरिक्त २० फेऱ्यांची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. सध्या मध्य आणि कोकण रेल्वेवरून २०२ फेऱ्या तसेच पश्चिम आणि कोकण रेल्वे ार्गावरून ५६ फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. आणखी २० फेऱ्यांमुळे उत्सव काळात मध्य-कोकण-पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या फेऱ्यांची संख्या २७८ पर्यंत पोहोचली आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व विशेष गाड्यांना पेण थांबा देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. गणेशोत्सवासाठी कोकण, मध्य आणि ‘पश्चिम रेल्वेवरून नियमित आणि विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. पेणमध्ये प्रवासी संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्याप पेण स्थानकात थांबा दिलेला नाही.

गणेशोत्सवासाठी आणखी २० फेऱ्या – गाडी क्रमांक ०१०३१/२ लोकम ान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी-लोकम ान्य टिळक टर्मिनस (८ फेऱ्या), गाडी क्रमांक ०१४४५/६ पुणे-रत्नागिरी-पुणे (२ फेऱ्या), गाडी क्रमांक ०१४४१/२ पनवेल-रत्नागिरी-पनवेल (२ फेऱ्या), गाडी क्रमांक ०१४४७/८पुणे- रत्नागिरी-पुणे ( ४ फेऱ्या), गाडी क्रमांक ०१४४३/४ (४ फेऱ्या) अशा अतिरिक्त फेऱ्या कोकण आणि मध्य – रेल्वेवर चालवण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular