26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriरत्नागिरीत शनिवारी आणखी एक नौका पकडली

रत्नागिरीत शनिवारी आणखी एक नौका पकडली

८-९ लाखाचे एलईडी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने १२ तासात आणखी एक धडक कारवाई केली आहे. शनिवारी ८ मार्च रोजी सकाळी जप्त करण्यात आलेल्या नौकेवरून ८-९ लाखाचे एलईडी साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही नौका मिरकरवाडा बंदरात उभी करुन ठेवण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार कार्यान्वित झालेल्या रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अवघ्या १२ तासात अनधिकृत मासेमारी करणारी दुसरी नौका पकडली आहे. जयगड समुद्रात शुक्रवारी रात्री एलईडी मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकेवर कारवाई केल्यानंतर शनिवारी ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मत्स्यव्यवसाय विभागाने महालक्ष्मी नौका इंडिया एमएच ४ एमएम २८१३ ही नौका ताब्यात घेतली.

या नौकेची झडती घेतली असता नौकेवर एलईडीबल्ब व जनरेटर आढळून आले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एल.ई.डी. नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ही नौका जप्त करून मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर मासळीचा साठा आढळून आलेला नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. अंदाजे ८-९ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. या नौकेवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहे. या नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular