27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriमासेमारांपुढे आणखी एक संकट उत्तरेच्या वाऱ्याने मासळी गायब

मासेमारांपुढे आणखी एक संकट उत्तरेच्या वाऱ्याने मासळी गायब

गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांनी नौका बंदरातच उभ्या करून ठेवल्या आहेत.

या हंगामात मच्छिमारांवर कोसळणारी संकटे थांबायचे नाव घेताना दिसत नाहीत. नारळी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या मासेमारीला अनेकवेळा खराब हवामानाचा ब्रेक लागला आणि मासेमारी ठप्प झाली होती. आता पुन्हा नव्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम मासेम ारीवर झाला आहे. या वाऱ्यांमुळे समुद्रातील मासे गायब झाले असून, गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांनी नौका बंदरातच उभ्या करून ठेवल्या आहेत. तर ट्रॉलिंग, फिशिंगच्या नौकाही परिस्थिती पाहून समुद्रात जात आहेत.

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना मासळी मिळत होती. मात्र, नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीवर परिणाम होऊ लागला. गेले अनेक दिवस किनारपट्टी भागात गार वारे वाहू लागले आहेत. वेगवान वाऱ्यामुळे समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या मच्छीमारांची तारांबळ उडत आहे. छोट्या मच्छीम ारांना मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी ओढताना त्रास होत असून, नौका कलंडण्याची भीती निर्माण झाली होती. यामुळे अनेक मच्छीमार माघारी परतले आहेत. काहींनी जवळच्या बंदरात व खाडीत सुरक्षिततेसाठी आधार घेतला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती अजून दोन दिवस राहणार आहे. ट्रॉलिंगने मासेमारी करणारे मच्छीमार धोका पत्करून समुद्रात जात आहेत. पण, नौका स्थिर राहत नसल्यामुळे जाळी टाकता येत नाहीत. या कालावधीत मासेही मिळत नसल्याने मच्छीमारांची अडचण होत आहे. वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, मासळी खोल समुद्रात गेली आहे. त्यामुळे अनेकांनी नौका बंदरातच ठेवल्या आहेत. समुद्रात वाहणारे वारे थांबण्याची प्रतीक्षा मच्छीमारांना आहे.

RELATED ARTICLES

Most Popular