28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

रेल्वे स्थानकांच्या आज लोकार्पण..

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी,...
HomeRajapurचिपळूण-पनवेल-रत्नागिरी अनारक्षित मेमू सोमवारपासून धावणार

चिपळूण-पनवेल-रत्नागिरी अनारक्षित मेमू सोमवारपासून धावणार

गर्दी पाहता कोकण रेल्वेने अनारक्षित मेमू चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची गर्दी पाहता कोकण रेल्वेने चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी दरम्यान अनारक्षित मेमू चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे. ०११६० चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे. या ट्रेनला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे स्थानकात थांबा दिला आहे.

अनारक्षित मेमू सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सुटून मंगळवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचणार आहे. या ट्रेनला करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी येथे थांबेल. चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकात थांबा दिला आहे. या ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू ८ डब्यांच्या असणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular