27.2 C
Ratnagiri
Monday, January 6, 2025

राज्यातील आता चोरटी वाळूला बसणार चाप…

राज्यातील वाळूमाफियांना वेसण घालण्यासाठी फडणवीस सरकारने मोठं...
HomeRajapurअणुस्कुरा घाटात दरड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरु

अणुस्कुरा घाटात दरड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरु

प्रशासनाने त्या मार्गावरून वाहतूक करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्राला कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील ओणी पाचल अणुस्कूरा मार्गावर घाटामध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्याने दरड कोसळली आहे.  त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या कोकण परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सर्वत्र पाण्याची पातळी वाढली आहे. गतवर्षी आंबा घाट बंद पडल्यानंतर या घाट मार्गावरून कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू करण्यात आली होती, मात्र त्यानंतर या घाटात देखील रस्त्याच्या अनेक अडचणी निर्माण झाल्यावर डागडुजी करण्याचे कोणतेही काम झाले नाही.

त्यामुळे कोसळलेल्या दरडीमुळे सध्या वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागा कडून मार्ग सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  गेले महिनाभर पडतं असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर आणि माती, दगड ढासळू लागले असल्याचे आता दिसून येतं आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्या मार्गावरून वाहतूक करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

अणुस्कुरा घाटात बुधवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली, याबाबतची माहिती कळताच राजापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गुरुवारी सकाळी घाटातील दरड काही प्रमाणात हटवण्यात आली. त्यामुळे जि पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आलेली ती, आता एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. सध्या कोकणात पावसाचे प्रमाण वाढतच असल्याने नागरिकांनी प्रवास करताना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. पुन्हा कधी काय होईल याची खात्री देता येणार नसल्याने शक्यतो अति वृष्टीच्या काळामध्ये कामाशिवाय बाहेर पडू नये.

RELATED ARTICLES

Most Popular