आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काजू बोंडे, मोहाची फुले यांपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी देशी मद्य याऐवजी विदेशी मद्य अशी करण्यात येणार आहे. या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे स्थानिक मद्य निर्मितीच्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे. काजू बोंडे व मोहाच्या फुलांच्या मद्यार्कापासून बनवण्यात येणाऱ्या मद्याचे वर्गीकरण हे २००५ पासून देशी मद्यामध्ये केले जात होते. या करण्यात आलेल्या वर्गीकरणामुळे या मद्याच्या विपणनास व मूल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या.
त्यामुळे काजूबोंडे, मोहाची फुले या पदार्थांसह स्थानिक उत्पादित होणाऱ्या फळे, फुलांपासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून जे मद्य तयार होतील त्याला देशी मद्य ऐवजी विदेशी मद्य असा दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची आत्ता दोन गटात वर्गवारी करण्यात आली. इलाईट आणि सुपर प्रिमियम असे दोन गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जी छोटी दुकान आहेत त्यांना आपल्या दुकानाचा विस्तार करून मद्य विक्री करण्याची कक्षा वाढवू शकतात.
दुकानाची विस्तार कक्षा ६०० चौरस फुटांपर्यंत वाढवू शकतात, तर सुपर प्रिमियम ६०० चौरस फुटांच्या वरती वाढवता येणार आहे. महसूल वाढवण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये या निर्णय आधीच घेण्यात आला आहे.
महसूल वाढीसाठी एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. यापुढे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानात उपलब्ध होणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल असा राज्य सरकारचा मानस आहे.