27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeChiplunगुरे वाहनाच्या आडवी आल्याने अपघात, ५ जण जखमी

गुरे वाहनाच्या आडवी आल्याने अपघात, ५ जण जखमी

चिपळूण येथे भरधाव वेगाने गाडी चालवताना रस्त्यावर अचानक गायी आल्याने चारचाकीने स्वीफ्ट कारला जोरदार धडक दिली.

रस्त्यावर बसणाऱ्या बेवारस गुरांमुळे अनेकदा अपघात घडून येतात. अनेक वेळा वाहन चालकांना जीवाला मुकावे लागते तर काही जण गंभीर जखमी होतात. जीवितहानी होऊन वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. महामार्गावर वेगाची ठराविक मर्यादा असते, त्यामुळे तो वेग सांभाळूनच पुढे प्रवास करावा लागतो. त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गुरे रस्त्याच्या कडेला चरत असताना अचानक वाहनाच्या मधी आल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारत येत नाही.

चिपळूण येथे भरधाव वेगाने गाडी चालवताना रस्त्यावर अचानक गायी आल्याने चारचाकीने स्वीफ्ट कारला जोरदार धडक दिली. या धडकेत ५ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल मोहिते २१, रा.  कुंभार्ली, चिपळूण हा आपल्या ताब्यातील स्वीफ्ट कार घेवून चिपळूण कराड रोडने अलोरेकडे जात असताना कराड बाजूने भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी गाडीवरील चालकाने रस्त्यावर गायी आल्याने ब्रेक न लावता समोरील स्वीफ्ट कारला विरुध्द दिशेला जावून जोरदार धडक दिली. या धडकेत ५ जण जखमी झाले. निकीता झेंडे, गौरव झेंडे, अंजली मोहिते, प्रफुल्ल मोहिते सर्व रा. कुंभार्ली हनुमानवाडी, चिपळूण, टाटा चालक किरण जाधव रा. सावर्डे, नाभिकवाडी, चिपळूण अशी अपघातात जखमीं झालेल्यांची नावे आहेत.

याबाबतची फिर्याद स्वीफ्ट कार चालक प्रफुल्ल मोहिते याने चिपळूण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार टाटा चालक किरण जाधव याच्यावर भादविकलम २७९, ३३७, ३३८  मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular