27.1 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriरत्नागिरीतील समुद्र किनाऱ्यांचे रुपडे पालटणार नाम. योगेश कदम

रत्नागिरीतील समुद्र किनाऱ्यांचे रुपडे पालटणार नाम. योगेश कदम

समुद्रकिनाऱ्यावर विविध मूलभूत आणि पर्यटनविषयक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत.

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम तिर्गत कोकण विभागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या संकल्पनेतून कोकणातील सर्व समुद्र किनाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्यासाठी तसेच सुसज्ज, स्वच्छ आणि अत्याधुनिक पर्यटनाच्या सोयी सुविधा असलेले समुद्र किनारे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी प्रथम प्राधान्याने दापोली. तालुक्यातील कर्दे समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी १४ कोटींचा निधी ग्रामविकास राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कोकणातील पर्यटनास नवी दिशा मिळणार असून कोकणाच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आलेली आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचा साखळी पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या योजनेअंतर्गत कर्दे समुद्रकिनाऱ्यावर विविध मूलभूत आणि पर्यटनविषयक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या विकास कामांमध्ये विशेषतः बचत गटाच्या महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून यात दुकाने व फेरीवाले झोन बांधण्यात येणार आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यालगत कोकणातील स्थानिक लोककला उत्सव व साहसी जल क्रीडा यांना वाव देण्यासाठी संस्कृतिक संकुल उभारण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. समुद्र किनारे स्वच्छ व सुशोभित ठेवण्यासाठी स्वयंचलित फ ड कंपोस्टर आणि प्लास्टिक श्रेडींग मशीन पुरवले जाणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular