26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriटीईटीसाठी ३० पर्यंत अर्ज भरण्याची मुदत, बीएड्, डीएड्धारकांना संधी

टीईटीसाठी ३० पर्यंत अर्ज भरण्याची मुदत, बीएड्, डीएड्धारकांना संधी

राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. जिल्ह्यातील बीएड्, डीएड्द्धारकांनी अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर नियुक्ती केली जाईल. पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षक या पदांसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाणार आहे. निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

२०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती भरावी. भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहिल. २०१८ व २०१९ च्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular