26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeSindhudurgरत्नागिरीत कुष्ठरुग्ण वसाहतीत,आयुष रुग्णालयाला मंजुरी

रत्नागिरीत कुष्ठरुग्ण वसाहतीत,आयुष रुग्णालयाला मंजुरी

३० खाटांचे आयुष रुग्णालय बांधण्याबाबत तरतूद केलेली आहे.

राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमाअंतर्गत आयुष सर्व्हिसेस या उपक्रमाखाली रत्नागिरीत ३० खाटांच्या आयुष रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. येतील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अडीच एकर जागेत हे रुग्णालय होणार होते; परंतु हा भाग सीबीझेड (झोन) असल्याने त्याची परवानगी रद्द करण्यात आली. त्याऐवजी महिला रुग्णालयाजवळील कुष्ठस्त्रण वसाहतीमधील ४ एकर जागा निश्चित करण्यात आली. त्याला अनुसरून सर्व मंजुऱ्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयुषअंतर्गत विविध सेवा जनतेसाठी उपलब्ध व्ह्याव्यात या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाने जिल्हास्तरावर आयुष रुग्णालय बांधण्याबाबत निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमांतर्गत आयुष सर्व्हिसेस या उपक्रमाखाली प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ३० खाटांचे आयुष रुग्णालय बांधण्याबाबत तरतूद केलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आयुष रुग्णालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथील शेती कंपाउंड या ठिकाणची जागा आयुष रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता; परंतु ही जागा ग्रीन झोनमध्ये येत असल्याने हा प्रस्ताव रद्द झाला. त्यानंतर महिला रुग्णालयाजवळील कुष्ठरुग्ण वसाहतीच्या जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. याला मंजुरी मिळाली आहे.

वसाहतीतील ४ एकर जागा आयुष रुग्णालयाला देण्यास मंजुरी मिळाली आहे. ३० खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायतीपासून विविध परवानग्या घेण्यात येत आहेत. आयुष मंत्रालय हे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय आहे. जे भारत सरकारचा भाग आहे. हे मंत्रालय पर्यायी औषधाच्या क्षेत्रात विकास, शिक्षण आणि संशोधनाची योजना आखण्याचे कार्य करते. रुग्णालयांमार्फत रुग्णांवर पूर्ण आयुर्वेदिक उपचार केला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular