19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriमिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा कामात मनमानी ग्रामस्थांचा आक्षेप

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा कामात मनमानी ग्रामस्थांचा आक्षेप

बंधाऱ्याचे काम खूप संथगतीने सुरू आहे.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम खूप संथगतीने सुरू आहे. याच गतीने काम सुरू राहिल्यास भाटकरवाडी ते जयहिंद चौक या डेंजर झोनमधील घरांना येणाऱ्या मॉन्सूनपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आराखड्याप्रमाणे बंधाऱ्याचे काम होत नसून ठेकेदार व पत्तन अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने सुरू आहे. अशा बेकायदेशीर बंधाऱ्यांच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन भाटीमिऱ्या धूपप्रतिनिबंधक बंधारा संवर्धन कृती समितीने पत्तन अभियंता हजारे यांना दिले. भाटकरवाडी व जयहिंद चौक येथील काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशाराही दिला आहे.

समितीचे अध्यक्ष नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज हे निवेदन दिले. या वेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम संथ गतीने चालू आहे, असे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, सप्टेंबर २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ काम बंद होते. काम सद्यःस्थितीत सुरू केले आहे; परंतु हे काम खूप संथगतीने चालू आहे. असेच काम सुरू राहिल्यास भाटकरवाडी ते जयहिंद चौक हा भाग डेंजर झोनला येणाऱ्या मॉन्सूनपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत झालेले बंधाऱ्यांचे काम पाहिले असता काही ठिकाणी समुद्राच्या लाटांनी तो विस्कळीत झाला आहे. यावरून असे दिसून येते की, संबंधित खात्याचे अभियंता यांनी तयार केलेल्या आराखडाप्रमाणे धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम झालेले नाही तरी भाटीमिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा संवर्धन कृती समिती भाटीमिऱ्या व ग्रामस्थांची अशी मागणी आहे.

की, पतन अभियंता विभागातील अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदार यांच्याकडून दिलेल्या आराखड्याप्रमाणे काम करून घेण्यात यावे. आमचे असे म्हणणे आहे की, हे काम योग्य पद्धतीने होत नसून मोनार्ज कंपनीचे अधिकारी, संबंधित ठेकेदार व पत्तनचे अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने काम चालू आहे. त्यामुळे अशा बंधाऱ्यांच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. भाटीमिऱ्यामधील भाटकरवाडी व जयहिंद चौक येथील काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचे ठरवले आहे, याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular