27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriजिल्ह्यात स्वच्छता अभियानासह मंदिरांवर रोषणाई एम. देवेंदर सिंह

जिल्ह्यात स्वच्छता अभियानासह मंदिरांवर रोषणाई एम. देवेंदर सिंह

जिल्ह्यातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर सफाई अभियान घेऊन जिल्ह्यातील सर्व मंदिरांवर २१ व २२ जानेवारीला विद्युत रोषणाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात किती मंदिरे आहेत त्याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ही आकडेवारी संकलित केली जाणार आहे. मंदिर सफाई अभियान, शहरी तसेच ग्रामीण भागात डीप क्लिनिंग ड्राईव्ह, महिला सशक्तीकरण उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि पीएम जनमन अभियानाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर, आदींसह जिल्ह्यातील मंदिर संस्थांनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यातील मंदिरांमध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबतची सविस्तर माहिती मंदिर संस्थांनी वेळेसह द्यावी. २२ जानेवारीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी भाट्ये समुद्रकिनारा, शासकीय विश्रामगृह आर्दीसारख्या ठिकाणांचा विचार करावा. २२ तारखेला जिल्ह्यातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबरोबर २१ जानेवारीलाही संध्याकाळी ७ वाजता रामकथा, गीत रामायण यासारख्या कार्यक्रमांचेही आयोजन करावे. मुख्याधिकारी बाबर यांनी यावेळी रत्नागिरी शहरी भागातील मंदिरांमध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.

जयेश मंगल सभागृह येथे २२ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासह महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. मंदिर संस्थांतर्फे उपस्थित प्रतिनिधींनी २२ जानेवारीला सकाळपासून कार्यक्रमांचे नियोजन असून, त्यात मंदिरांना रोषणाई, प्रसाद वाटप, दुपारचे खिचडी वाटप, थेट प्रक्षेपण, रामरक्षा कथन, ढोलताशे वादन, फटाके वाजवणे आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिर सफाई अभियान, शहरी तसेच ग्रामीण भागातील डीप क्लिनिंग ड्राईव्ह, महिला सशक्तीकरण उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि पीएम जनमन अभियानाबाबत जिल्हा, उपविभाग आणि तालुकास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करून वेळोवेळी आढावा घेण्याबाबत सूचना दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular