25.7 C
Ratnagiri
Sunday, September 8, 2024

19 वर्षीय फलंदाजाने रचला इतिहास, मोडला सचिन तेंडुलकरचा 33 वर्ष जुना विक्रम

दुलीप करंडक स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली...

या दिवशी रिलीज होणार ‘पंचायत’चा तामिळ रिमेक…

'पंचायत' ही हिंदीतील सर्वात प्रसिद्ध आणि हिट...
HomeRatnagiriआशा, गटप्रवर्तकांचा संप सुरूच राहणार

आशा, गटप्रवर्तकांचा संप सुरूच राहणार

राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांमध्ये शासनाच्या विरुद्ध तीव्र नाराजी आहे.

आशा व गटप्रवर्तक महिला यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेला संप शासन अद्यादेश काढत नाही तोपर्यंत सुरूच ठेवायचा, असा निर्णय घेण्यात आला आहे तसेच संपाची तीव्रता वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले आहे. या संपात जिल्ह्यातील १ हजार ३३३ आशापैकी ८८९ आशा सहभागी झाल्या असून ४४५ आशा कामावर रूजू आहेत. गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला विविध मागण्यांसाठी आंदोलने करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली.

त्यानुसार गेले महिनाभर संप चालू आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार शासनाकडून आदेश काढलेला नाही. त्यामुळे राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांमध्ये शासनाच्या विरुद्ध तीव्र नाराजी आहे. त्यामुळे संप करण्यात आला असून, ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणा विस्कळित झाली आहे. संप मागे घेतला जावा यासाठी संघटनेला आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर संघटनांकडून संप मागे घेण्याच्या हालचाली केल्या जातील, असा अंदाज होता; मात्र शासननिर्णय काढलेला नसल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले दोन दिवस हे आंदोलन सुरू केले आहे.l

RELATED ARTICLES

Most Popular