28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

रत्नागिरीमध्ये परिवर्तन घडवायचेच या उद्देशाने माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून रत्नागिरी-संगमेश्वर...

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...
HomeRatnagiri'पीएमजेवाय'चे काम करण्यास आशांचा नकार

‘पीएमजेवाय’चे काम करण्यास आशांचा नकार

ऑनलाईन काम केल्याचा पुरेसा मोबदला देण्याऐवजी एनआरएचएम महिलांच्याकडूनच सक्तीने रक्कम वसूल केली जात आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पीएमजेवाय ईकेवायसी करण्याचे काम पुरेसा मोबदला न देता करून घेतले जात आहे. यासाठी सर्वप्रथम स्मार्ट मोबाईल व रिचार्ज भत्ता दरमहा ४०० रुपये द्यावा त्या शिवाय ऑनलाईन कोणतेही काम आशा व गटप्रवर्तक महिलांना सांगण्यात येऊ नये यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर संघटनांकडून निवेदने दिले जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नुकतेच पीएमजेवाय (प्रधानमंत्री जनआरोग्य योजना) ई केवायसी कार्ड काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम आशांच्या नेमून दिलेल्या कामामध्ये येत नाही. हे काम ऑनलाईन करावे लागणार आहे.

त्यासाठी आवश्यक मोबाईल किंवा रिचार्जचा मोबदला देण्याबाबत शासनाकडून निर्णय झालेला नाही. एका महिन्याला शंभर रुपये या प्रमाणे रिचार्जसाठी पैसे दिले जाणार आहेत. संपूर्ण महिन्यामध्ये १०० रुपये रिचार्जवर मोबाईल सुरू ठेवणे शक्य नाही. महिलांना दरमहा ४०० रुपयांचा रिचार्ज मारल्याशिवाय ऑनलाईन काम करता येत नाही. अशा कामांना जादाचे ३०० रुपये आशा महिलांना द्यावे लागत आहेत.

ऑनलाईन काम केल्याचा पुरेसा मोबदला देण्याऐवजी एनआरएचएम महिलांच्याकडूनच सक्तीने रक्कम वसूल केली जात आहे. याविरोधात महाराष्ट्र राज्य आशा वर्कस्, गटप्रवतर्क आणि आरोग्य कामगार संघटनेने जिल्हापरिषदेसमोर मागील आठवड्यात आंदोलन केले होते. त्यानंतर आता प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या आशा वर्कस् तेथील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ऑनलाईन कामाचा योग्य मोबदला देत नाहीत, तोपर्यंत काम करणार नाही असे ठणकावत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular