25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriअॅपवरील टास्क पूर्ण केल्याच्या आमिषाने ३० हजारांची फसवणूक

अॅपवरील टास्क पूर्ण केल्याच्या आमिषाने ३० हजारांची फसवणूक

संशयिताने टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील, असे सांगून तसेच प्रत्येक टास्कसाठी रक्कम भरावी लागेल असे सांगितले.

व्हॉटस्अॅप व टेलिग्राम अॅपवरील टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून ३० हजार ७२० रुपयांची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० मार्च ते ३० मे २०२३ या कालावधीत वीर सावरकर चौक रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर अज्ञाताने फोन करून व्हॉटस्अॅप व टेलिग्राम अॅपवर चॅट सुरू केले. संशयिताने टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील, असे सांगून तसेच प्रत्येक टास्कसाठी रक्कम भरावी लागेल असे सांगितले.

जसे की, युट्युबर एखादा व्हिडिओ लाईक किंवा शेअर केल्यावर पैसे दिले जातात; म्हणून फिर्यादी यांनी त्यांचे नाव, वय, बैंक अकाउंट नंबर, आयएफएससी कोड अशी माहिती संशयिताने मागितली. ती फिर्यादीने दिली. टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रक्कमेसह रिवार्ड मिळेल, असे सांगून सुरुवातीला भरलेल्या रकमेवर टास्क पूर्ण केल्यावर रिवार्ड व भरलेली रक्कम परत केली; मात्र त्यानंतर फिर्यादी यांनी टास्कसाठी भरलेली रक्कम ३० हजार ७२० रुपये परत दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular