27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriकाजळी नदी पुलावर टेम्पो उलटला

काजळी नदी पुलावर टेम्पो उलटला

आयशर टेम्पो आंजणारी घाटीतील तीव्र उतारावरील वळणावर काजळी नदी पुलाजवळ पलटी झाला.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो आंजणारी घाटीतील काजळी नदीच्या पुलाजवळील तीव्र उतारावरील वळणावर पलटी झाला. या अपघातात चालकासह क्लिनर देखील जखमी झाला असून या दोघांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक बादशहा लतिफ हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालला होता. या आयशर टेम्पोत प्लास्टिकची बॅलर भरलेली होती. गुरुवारी सकाळी ६.३० वा.च्या सुमारास आंजणारी घाटीतील तीव्र उतार उतरत असताना हा आयशर टेम्पो आंजणारी घाटीतील तीव्र उतारावरील वळणावर काजळी नदी पुलाजवळ पलटी झाला.

हा आयशर टेम्पो पलटी झाल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातात आयशर टेम्पो चालक रफिक लतिक हा आतमध्ये अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळतात लांजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी टेम्पोमध्ये अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. चालन रफिक लतिक याच्यासह क्लिनर सत्यवान संजीव मोरे हा देखील किरकोळ जखमी झाला होता. या दोघांना अधिक उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात येथे हलविण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टे. राजेंद्र कांबळे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular