27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriगणपतीपुळे येथील गणेश मंदिरात १६ सप्टेंबरपासून भाद्रपदी उत्सव

गणपतीपुळे येथील गणेश मंदिरात १६ सप्टेंबरपासून भाद्रपदी उत्सव

प्रतिवर्षाप्रमाणे संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू लंबोदराच्या मंदिरात शनिवार दि. १६ सप्टें. ते बुधवार दि. २० सप्टें. म्हणजेच भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी असा पाच दिवस ‘श्रीं’चा भाद्रपदी गणेशोत्सव संपत्र होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी १६ सप्टें. रोजी सकाळी ९.३० वा. ‘श्रीं’ची महापूजा आणि त्यानंतर दुपारी महाप्रसाद होईल. रविवारी १७ सप्टें. रोजी दुपारी ११ ते १२ या वेळात सहस्रमोदक समर्पण होणार आहे.

त्याचप्रमाणे दररोज सायं.७ ते ७.३० या वेळात सामूहिक आरती आणि मंत्रपुष्प होईल. तसेच दररोज सायं. ७.३० ते ९.३० या वेळात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्री. कैलाश यशवंत खरे यांची कीर्तने सादर होणार आहेत. मंगळवार दि. १८ सप्टें. ला सकाळी ११.३० ते दु. २ या वेळात महाप्रसाद होईल. बुधवार दि. १९ सप्टें. ला दु. ४ .ते ६ या वेळेत पालखी प्रदक्षिणेसाठी निघेल आणि ऋषीपंचमीच्या दिवशी म्हणजेच दि. २० सप्टें. ला उत्सवाची सांगता होईल. या उत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांचा आणि ‘श्रीं’च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular