लोकसभा निवडणुकीतील यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने १६ ऑगस्टला मुंबईत राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीसंबधीच्या प्रचाराची दिशा व अन्य महत्वाच्या गोष्टींबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, तालुकानिहाय कार्यकारिणी, जिल्हा युवक कार्यकारिणी, तालुका युवक कार्यकारिणी, जेष्ठ सदस्य हितचिंतक यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेला राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चेंडे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, युवक अध्यक्ष सुजित सकपाळ जिल्हा अध्यक्ष प्रितम रुके, सरचिटणीस आदेश मर्चेंडे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कोकण प्रदेश आर.पी.आय. मेळावा व केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार खेड येथे होणार आहे. नामदार आठवले हे सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री पदावर विराजम ान झाल्यानंतर प्रथमच कोकणात येत असून त्यांचा कोकण प्रदेशच्यावतीने हा भव्य दिव्य सत्कार होणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा आर. पी.आयच्या वतीने ‘रत्नागिरी येथे दि. २० सप्टेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमालाही नामदार रामदास आठवले हे उपस्थित राहणार आहेत याबाबतही जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी खेड तालुका अध्यक्ष संतोष कापशे, दापोली तालुका उपाध्यक्ष संजय तांबे कार्याअध्यक्ष किरण गमरे सरचिटणीस दिनेश रुके मंडणगड तालुका सचिव रामदास खैरे, चिपळूण तालुका चिटणीस उमेश सकपाळ, गुहागर तालुका अध्यक्ष संदीप कदम, रत्नागिरी तालुका अध्यक्ष विलास कांबळे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिलिंद सावंत, लांजा तालुक्याचे विकास कदम, राजापूर तालुका अध्यक्ष राजेन बेतकर जिल्हा उपाध्यक्ष विजय कदम, जिल्हा कोषाध्यक्ष गोतम तांबे, जिल्हा युवक चिंटणीस जितेंद्र तांबे, जिल्हा संघटक, खेड व इतर तर आर.पी.आय पदाधिकारी मोठ्या संख्येने मेहनत घेत आहेत.