23.5 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeKhed'सीईटीपी'ची पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न - उद्योजकांना फटका

‘सीईटीपी’ची पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न – उद्योजकांना फटका

या पाईपलाईनला अधूनमधून गळती लागते.

लोटे सीईटीपीतून करंबवणे खाडीत जाणारी सांडपाणी पाईपलाईन कोतवली येथील सोनपात्रा नदीत कोकण रेल्वेच्या पुलाजवळ तीक्ष्ण हत्याराने कापण्याचा प्रयत्न झाला. ६३० मि. मी. व्यासाच्या एचडीपीई पाईपलाईनला गळती लागल्यानंतर लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे उत्पादन दोन दिवस थांबल्यामुळे उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. यामुळे संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय सीईटीपीने घेतला आहे. सीईटीपीसह एमआयडीसीने गंभीर दखल घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिले आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे रासायनिक सांडपाणी सीईटीपीमध्ये घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेनंतर ते सांडपाणी ६३० मिलिमीटर व्यासाच्या एचडी पाईपलाईनमधून करंबवणे खाडीला सोडले जाते. त्यासाठी सुमारे साडेसात किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.

या पाईपलाईनला अधूनमधून गळती लागते. त्याची एमआयडीसीकडून दुरुस्ती केली जाते. काहीवेळेला गळती मानवनिर्मित तर काहीवेळेला ती तांत्रिक बिघाडामुळे होते. मात्र, मोठी पाईपलाईन तीक्ष्ण हत्याराने कापण्याचा अथवा धाव घालून तोडण्याचा प्रयत्न प्रथमच झाल्याने प्रशासकीय यंत्रणांनी तो गांभीर्याने घेतला आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता पाईपलाईनची देखभाल करणारे विजय जुवळे हे गस्त घालत असताना त्यांना रेल्वेपुलाजवळ अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण अवजाराच्या साहाय्याने पाईपलाईन कापण्याचा तसेच घाव घालून तोडण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. जुवळे यांनी याबाबतची माहिती सीईटीपीसह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिली. सीईटीपी आणि एमआयडीसीने पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यापूर्वी दगडगोटे, सिमेंटच्या गोण्या – लोटे औद्योगिक वसाहत प्रामुख्याने रासायनिक झोन असल्याने प्रदुषणाच्या तक्रारी येतच असतात. काही कारखान्यांमधून नाल्यांमध्ये सांडपाणी सोडणे हे नित्याचे प्रकार असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांच्यावर कारवाई करत नाही. अलीकडेच लोटेत पाईपलाईन चेंबर्समध्ये प्लास्टिक, दगडगोटे, सिमेंटच्या रिकाम्या गोणी टाकण्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत लोटे उद्योजक संघटनेनेही जाहीरपणे नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती; मात्र हे प्रकार वाढत चालले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular