28.8 C
Ratnagiri
Tuesday, March 11, 2025

देवरहाटीच्या जमिनी परत करा ! रत्नागिरीमध्ये घंटानाद आंदोलन

देवरहाटीच्या जमिनी शासनाने हस्तगत केल्या आहेत. त्या...

छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक व्हावे – प्रमोद जठार

संभाजी महाराजांनी ११ मार्च १६८९ मध्ये बलिदान...

दापोलीमधील वाहतुकीची गती मंदावली…

येथील एसटी बसस्थानक ते बुरोंडीनाका या परिसरातील...
HomeRajapurटेस्लासारखा इलेक्ट्रीकल व्हेईकल निर्मितीचा कारखाना जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न - आमदार किरण सामंत

टेस्लासारखा इलेक्ट्रीकल व्हेईकल निर्मितीचा कारखाना जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न – आमदार किरण सामंत

सर्वांगीण विकासासाठी येथे रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे.

जिल्ह्यासह रत्नागिरी, लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येथे रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठीच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टेस्लासारखा इलेक्ट्रीकल व्हेईकल निर्मितीचा कारखाना जिल्ह्यात आणण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला रस्ता, जलम ार्ग, हवाई मार्गाची सुविधा उपलब्ध असल्याने मुंबईनंतर रत्नागिरीतच अशा प्रकारचा उद्योग उभारू शकती अशी सर्वांची खात्री झाल्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी असल्याने आ. सामंत शनिवारी रत्नागिरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.

आपण लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलो तरीही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही आपले बारीक लक्ष आहे. ‘विकासकामांना प्राधान्य देताना या दोन्हीही मतदारसंघातील एकही काम येणाऱ्या पुढील काळात शिल्लक राहणार नाही, असा विश्वास आ. सामंत यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपणे मतदारसंघातील मतदारांना विकासाचे आश्वासन दिले होते. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी राजापूर हा विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्‌या खूप मोठा आहे. याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. सह्याद्रीच्या टोकापासून समुद्र किनाऱ्यापर्यंत विस्तीर्ण असलेला मतदारसंघ यापूव विकासापासून वंचित राहिला होता. पुढील पाच वर्षे कालावधीत या मतदारसंघाचा कायापालट झालेला दिसेल, असा विश्वास आ. सामंत यांनी व्यक्त केला.

राजापूर विधानसभा मतदासंघाच्या किनारपट्टी भागात भूमीगत वीजवाहिनी टाकण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून २३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर या मतदारासंघाचा ४२३ कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्यात यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून लांजा, राजापूर, देवरूख, रत्नागिरी या डेपोंना प्रत्येकी दहा बसेस मंजूर झाल्या आहेत त्यापैकी लांजा दोन, राजापूर पाच, रत्नागिरी दहा अशा १७ बसेस प्राप्त झाल्या असून त्याच लोकार्पण सोहळा आज संपन्न होणार आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारमधून निधी आणण्यात आपण. यशस्वी होणार आहोत. त्याबाबतचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी देण्याची तयारी ना. गडकरी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे निधीबाबत केंद्र सरकारकडून कोणतीच अडचण येणार नसल्याचे आ. किरण सामंत यांनी सांगितले…

RELATED ARTICLES

Most Popular