26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriआमदार साळवी बंधुंसह एसीबी कार्यालयात चौकशीला हजर

आमदार साळवी बंधुंसह एसीबी कार्यालयात चौकशीला हजर

या निमित्ताने शिवसेनेने मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे पहायला मिळाले.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते तथा आमदार राजन साळवी यांना त्यांचे मोठे बंधू दीपक साळवी यांच्यासह पुन्हा एसीबीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. आमदार साळवी या चौकशीसाठी एसीबी कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत हजारो शिवसैनिक उपस्थित होते. आपल्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी है सर्व शिवसैनिक आले होते. या निमित्ताने शिवसेनेने मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे पहायला मिळाले. खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयापासून शासनाविरुद्ध घोषणादेत साळवींसह हजारो समर्थक एसीबीच्या कार्यालयावर धडकले.

पोलिस यंत्रणेशी आपले काही वैर नाही, पोलिसांता पूर्ण सहकार्य करू. असे हात जोडुन कार्यकर्त्यांना आवाहन करत साळवी बंधु एसीबीच्या कार्यालयात चौकशीला हजर झाले. आमदार राजन साळवी यांची वर्षभरापासून चौकशी सुरू आहे. रायगड एसीबीकडुन त्यांची ६ वेळा चौकशी झाली. दोन दिवसांपूर्वी राजन साळवी यांच्या घरासह कार्यालयावर एसीबीने छापे टाकले होते. दहा तास घराची झडती घेऊन त्यांच्यासह पत्नी व मुलावर अपसंपदाबाबत गुन्हे दाखल केले गेले.

शिवसैनिकांचा पाठिंबा – यामुळे रत्नागिरीत राजकीय वातावरण तापलेले होते. अनेक शिवसैनिकांनी साळवी यांना पाठिंबा दिला. जिल्हाभरातून अनेकांनी त्यांच्या निवास्थानी गर्दी केली होती. असे तप्त वातावरण असताना पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचे बंधू दीपक साळवी यांना एसीबीने रत्नागिरीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. तशा आशयाची नोटिस देण्यात आली होती. सोमवारी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी राजन साळवी यांना जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पाठिंबा दिला. शिवसैनिक खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात गोळा झाले. तेथुन जिल्हाभरातून हजारो शिवसैनिकानी रत्नागिरीत येऊन सरकारचा जाहीर निषेध करत आमदार डॉ. राजन साळवी यांना पाठींबा देत सारे एसीबी कार्यालयावर धडकले. कोणताही गोंधळ, गडबड न करता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आमदार साळवी चौकशीला सामोरे गेले.

कुटुंबियांना त्रास – चौकशीला मी सहकार्य करत असताना माझया कुटुंबियांना त्रास देवून त्यांना माझयापासून वेगळ करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र माझे कुटूंबिय, पक्ष व रत्नागिरी जिल्ह्यातील जनता माझ्यासोबत आहे. हाच माझा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली. रत्नागिरी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात दोन तास चौकशी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

कुटुंब माझ्यासोबत – पोलिसांच्या चौकशीला मी सहकार्य करणार असे सांगताना आमचे. एकत्र कुटुंब आहे. मी राजकारणामध्ये ४० वर्ष आहे. पण माझे मोठे बंधू म्हणून त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून मला आत्तापर्यंत मदत केली आहे. त्यांच्यामुळेच मी आज राजकारणात उभा आहे. म्हणून त्यांचे व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या मागे शुक्लकाष्ट लावायचं हा त्यांचा हेतू असू शकेल.म ात्र माझे कुटुंबिय कायम माझ्या सोबत असल्याचे आ. साळवी यांनी सांगितले.

जिल्हाभरातून शिवसैनिक दाखल – आ.राजन साळवी यांच्यासह त्यांच्या जेष्ठबंधूनासोमवारीचौकशीसाठी बोलविण्यात आल्याने लांजा, राजापूर, रत्नागिरीसह चिपळूण, खेड येथील शिवसैनिकांनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये महिला शिवसैनिकांची संख्या अधिक होती. उपविभागिय अधिकारी विनित चौधरी यांच्या सह पोलीस निरिक्षक महेश तोरसकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. तर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, संजय साळवी, प्रमोद शेरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular