29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRajapurरोलर स्केटिंग अकादमीतर्फे अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रा जिल्ह्यात दाखल

रोलर स्केटिंग अकादमीतर्फे अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रा जिल्ह्यात दाखल

वारणसी येथील राजेश डोगरा रोलर स्केटिंग अकादमीतर्फे अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रा काढण्यात आली आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत होणाऱ्‍या यात्रेमध्ये ११ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी आणि कामाने प्रभावित होऊन त्यांच्याच वाराणसी लोकसभा मतदारातील वाराणसी स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सुमारे पाच हजार किमी ही यात्रा काढण्यात येत आली आहे. वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन, स्त्री शिक्षण, ग्राहक जागृती याबरोबर भारताची जैवविविधता अन् संस्कृती याबाबत जनजागृती, प्रबोधन करण्याच्या उद्देशाने वारणसी येथील राजेश डोगरा रोलर स्केटिंग अकादमीतर्फे अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत होणाऱ्‍या यात्रेमध्ये ११ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. तब्बल आठ राज्यातून प्रवास करत तीन हजार किमी यात्रा त्यांनी पूर्ण केली आहे.

या यात्रेमध्ये १६ ते ७२ अशा वयोगटातील २० जण सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ९ महिला, मुलींचा समावेश असून दिवसभरामध्ये सरासरी ६० ते ९० किमी प्रवास करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हि यात्रा सध्या राजापुरात दाखल झाली असून, अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रेचे जकातनाका येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तालुकाध्यक्षा श्रुती ताम्हणकर यांनी तर शिशुविहार येथे राष्ट्रसेविका समिती राजापूर, भगिनी मंडळ, बजरंगदल राजापूर यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

या वेळी माधवी हर्डीकर, नेत्रा गोखले, गौरी अभ्यंकर, प्रतिभा रेडीज, आंबेकर, संजीवनी पाटणकर, सुयोगा जठार, स्नेहा नाखरे, सप्रे, दीक्षित, दिलीप गोखले, अभ्यंकर आदी उपस्थित होते. सप्टेंबर महिन्यामध्ये या यात्रेला सुरुवात झाली असून, देशातील १३ राज्य, शंभर शहर आणि अंतर्गत गावांमधून प्रवास करत कन्याकुमारी येथे २५ डिसेंबरला यात्रेची सांगता होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular