28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeDapoli५ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, ५ संशयित ताब्यात

५ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, ५ संशयित ताब्यात

दापोली तालुक्यातील आंजर्ले व अडखळ येथील तिघांसह पुण्यातील दोघा संशयितांना व्हेल माशाची उलटी विक्री प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली

कोकणामध्ये मागील वर्षभर वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक वेळा या घटना उघडकीस आल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये हे अवयव तस्करीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. दापोली तालुक्यातील आंजर्ले व अडखळ येथील तिघांसह पुण्यातील दोघा संशयितांना व्हेल माशाची उलटी विक्री प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ५ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली असून, संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांना व्हेल माशाची कोट्यवधीच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सहाच्या सुमारास फर्ग्युसन महाविद्यालय बस थांब्याच्या मागील बाजूस तीन व्यक्ती संशयास्पदरीत्या उभे असलेले पोलिस पथकाला दिसले. राकेश राजेंद्र कोरडे वय २८, रा. आंजर्ले, ता. दापोली,  नवाज अब्दुल्ला कुरुपकर वय २४, अजीम काजी दोघे रा. अडखळ जुईकर मोहल्ला, विजय ठाणगे, अक्षय ठाणगे दोघेही पुणे अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात व्हेल माशाच्या उलटीचे दोन मोठे तुकडे आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ती विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यासाठी मदत करण्यासाठी दोन व्यक्ती आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी ५ व्यक्तींना ताब्यात घेतले.

याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात राकेश कोरडे, नवाज कुरुपकर, अजीम काजी, विजय ठाणगे, अक्षय ठाणगे (पुणे) या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४९(ब), ५१, ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular