27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKhedखेडमधील दाउदच्या मालमत्तांचा लिलाव

खेडमधील दाउदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदची एकूण २१, २७५ चौरस मीटर एवढी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ मुंबके गावातील ४ मालमत्तांचा लिलाव पूर्ण झाला. २ मालमत्तेसाठी अनुक्रमे २.०१ कोटी आणि ३.२८ लाखांची यशस्वी बोली लावण्यात आली. इतर २ मालमत्तांची विक्री झाली नाही. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमच्या या चार म ालमत्तांचा लिलाव, अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या एसएएफइएमए कार्यालयात केला गेला. २ कोटींना विकल्या गेलेल्या जमिनीची मूळ किंमत १५ हजार ४४० रुपये इतकीच होती. तर ३.२८ लाखांची बोली लागलेल्या जमिनीची मूळ किंमत १ लाख ५६ हजार २७० रुपये एवढी होती.

केंद्र सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबके या दाऊदच्या मूळगावी असलेल्या ४ भूखंडांचा लिलाव करण्याचे आदेश दिले होते. दाऊदची एकूण २१, २७५ चौरस मीटर एवढी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील मुंबके हे गाव ६७ वर्षीय दाऊदचं जन्मस्थान आहे. येथे त्याने १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येण्यापूर्वी आपले बालपण घालवले होते. सर्वप्रथम, आयकर विभागाने २००० मध्ये दाऊदच्या ११ मालमत्तांचा लिलाव केला होता. मात्र त्यावेळी लिलाव प्रक्रियेत कोणीही आले नाही. मात्र गेल्या काही वर्षांत दाऊदच्या बऱ्याच मालमत्ता विकून त्याचा ताबा खरेदीदारांना देण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे.

२०१८ मध्ये दाऊदचे नागपाडा येथील हॉटेल, गेस्ट हाऊस आणि एक इमारत विकण्यात आली. तसेच दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या दक्षिण मुंबईतील फ्लॅटचा लिलाव करण्यातही तपास यंत्रणेला यश आले. मुंबईसह दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाच्या रत्नागिरीमधील १.१० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आलाय. यामध्ये जमिनीचे दोन भूखंड आणि एका बंद पेट्रोल पंपाचा लिलाव करण्यात आला. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे या गावात दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या नावावर या मालमत्तांची नोंद होती.

RELATED ARTICLES

Most Popular