28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriडीडी चोरीला गेल्याची खोटी माहिती देत अविनाश लाड दिशाभूल करत आहेत

डीडी चोरीला गेल्याची खोटी माहिती देत अविनाश लाड दिशाभूल करत आहेत

पारदर्शक असणाऱ्या नगरपंचायत प्रशासनावर चोरीचा आळ घेत आहेत.

लांजा नगरपंचायतीमधून विकास कामांच्या निविदा प्रक्रियेच्या बयाणा रक्कमेचा डीडी चोरीला गेल्याची चुकीची माहिती अविनाश लाड देत असल्याचा आरोप लांज्याचे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी केला आहे. ते खोटे बोलत असून लोकांची दिशाभूल करत आहेत असा आरोप देखील नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. न.पं. प्रशासन पारदर्शकपणे सारी प्रक्रिया मार्गी लावत असल्याचा दावा नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला. नगरपंचायतीमधून कोणत्याही कर्मचाऱ्याने डीडी चोरीला गेला असे अविनाश लाड यांना संगितलेले नाही. मात्र लाड हे स्वतः राजकीय दबाव आणून खोटे-नाट्या तक्रारी करत आहेत. मनोहर बाईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अविनाश लाड यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन डीडी पाहण्याचे कारण देत त्या दिवशी फाईल पाहण्यासाठी मागवल्या. कर्मचाऱ्यांना दमदाटी करून गैरवर्तन केले. लांजा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या लांजा नगरपंचायतीवर डीडी चोरीचा नाहक खोटा आरोप राजकीय सूड भावनेतून ते करत आहेत.

पारदर्शक असणाऱ्या नगरपंचायत प्रशासनावर चोरीचा आळ घेत आहेत. हे केवळ राजकीय स्वार्थापोटी सुरू आहे. नगरपंचायत प्रशासन, कर्मचारी योग्य पद्धतीने कामकाज करत आहेत. असे देखील नगराध्यक्ष बाईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. खोटे-नाटे करून नाहक बदनामी खपवून घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. ऑनलाईन निविदा भरताना संबंधित कंपनी, ठेकेदार यांनी, प्रशासनाला आवश्यक कागदांची पुर्तता करावी लागते. तसे न केल्यास भरलेली निविदा प्रशासकीय नियम व अटीनुसार अपात्र ठरवली जाते. लांजा नगरपंचायत प्रशासन पारदर्शकपणे काम करत आहे आणि संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे काँगसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी प्रसारमाध्यमांना डीडी चोरी झाल्याचा आरोप करत दिलेली माहिती सिद्ध करून दाखवावी असे आव्हान देखील लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अविनाश लाड यांना दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular