26.6 C
Ratnagiri
Monday, November 4, 2024

OnePlus चा सर्वात शक्तिशाली फोन 24GB RAM आणि 1TB स्टोरेजसह लॉन्च …

चीनी टेक कंपनी OnePlus च्या नवीन फ्लॅगशिप...

भारतीय फलंदाजी पुन्हा अडचणीत, दहा मिनिटांत भारताची पडझड

बंगळूर आणि पुणे कसोटीत भारतीय संघाच्या पराभवात...
HomeRajapurओणीमध्ये सोन्या, चांदीची दुकाने फोडत चोरट्यांची 'दिवाळी'

ओणीमध्ये सोन्या, चांदीची दुकाने फोडत चोरट्यांची ‘दिवाळी’

दुकानफोडीमध्ये रोख रक्कमेसह सुमारे २ लाख ९२ हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेला.

निवडणुकांची रणधुम ाळी आणि दिवाळीची धामधूम सुरु असताना ओणी बाजारपेठेतील २ ज्वेलर्सच्या दुकानांवर धाड टाकत चोरट्यांनी जवळपास ३ लाखांचा ऐवज लंपास केला. आहे. सणासुदीच्या दिवसात सोने, चांदीच्या दुकांनावर डल्ला मारत चोरट्यांनी ‘दिवाळी’ साजरी केल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत असून २४ तास उलटले तरी अजूनही आरोपी पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र कोणातरी माहीतगाराचे हे काम असल्याचा पोलीसांचा कयास आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील ओणी येथील झालेल्या दुकानफोडीमध्ये रोख रक्कमेसह सुमारे २ लाख ९२ हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेला. शुक्रवारी ही चोरी उघडकीस आली. या चोरीबाबतची रितसर फिर्याद राजापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. महामार्गावरील या धाडसी चोरीमध्ये स्थानिक माहितगाराचा हात असण्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, दिवाळीच्या धाम धूमीमध्ये झालेल्या या धाडसी चोरीचा उलगडा करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील ओणी बाजारपेठेत खरवते येथील सुर्यकांत सागवेकर यांचे साई ज्वेलर्स हे बाजारपेठेमध्ये दुकान आहे. दुकानाचे मालक गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर शुक्रवारी सकाळी ते नेहम ीपमाणे दुकाने उघडेण्यासाठी आले असता दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील किंमती वस्तू चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत साई ज्वेलर्सचे मालक सुर्यकांत सागवेकर यांनी राजापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून त्यामध्ये १९ हजार रूपयांच्या रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून २ लाख ९२ हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, दुकानफोडीची माहिती मिळताच तात्काळ पोलिसही घटनास्थळी दाखल होवून त्यांनी तपासाच्यादृष्टीने चक्रे हलविण्याला सुरूवात केली. त्यामध्ये प्रथमदर्शनी चोरट्यांचा माग लागण्याच्यादृष्टीने सध्या कोणतेही धागेदोरे सापडले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सागवेकर यांच्या दुकानासह चुनाकोळवण येथील रविंद्र देवरूखकर यांचेही ज्वेलर्सचे दुकान फोडण्यात आले आहे. सागवेकर यांचे दुकान मुख्य बाजारपेठेत तर देवरूखकर यांचे दुकान ओणी-कळसवली तिठ्यालगत आहे. दरम्यान, तालुक्यातील ओणी येथील बाजारपेठ मुंबई-गोवा महामार्गावर असून या परिसरामध्ये वाहनांची नेहमीच वर्दळ असते. लोकांचीही रात्री उशीरापर्यंत बाजारपेठेमध्ये वर्दळ असते. अशा स्थितीमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. त्यामुळे या चोरट्यांमध्ये स्थानिक माहितगाराचा हात असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे या धाडसी चोरीचा उलगडा करण्याचे आव्हान राजापूर पोलिसांसमोर ठाकले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular