27.6 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriवाटूळ-दाभोळे रस्त्याचे काम निकृष्ट ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त, १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा

वाटूळ-दाभोळे रस्त्याचे काम निकृष्ट ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त, १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा

वाटूळ-दाभोळे या २८ किमीच्या रस्त्याचे काम नाईक कंपनीने पूर्ण केल्याचे दाखवले आहे.या रस्ताकामावर सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला

तालुक्याच्या पूर्व भागातून गेलेल्या वाटूळ ते दाभोळे या २८ किमीच्या रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या रस्ता कामात अनेक ठिकाणी त्रुटी आहेत. त्याचा त्रास त्या महामार्गावरील गावे आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने याबाबत कार्यवाही न केल्यास १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी दिला आहे. लांजा शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत माहिती देताना हेगिष्टे यांनी सांगितले, वाटूळ-दाभोळे या २८ किमीच्या रस्त्याचे काम नाईक कंपनीने पूर्ण केल्याचे दाखवले आहे.

या रस्ताकामावर सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असताना प्रत्यक्ष काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काही ठिकाणी प्रवासी निवाराशेडच्या ठिकाणी रस्त्यावर भराव टाकून वाट अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर वस्तीकडे जाणाऱ्या काही रस्त्यांच्या ठिकाणी पाईप टाकलेले नाहीत. परिणामी, सध्या पडणाऱ्या हे गटाराने ऐवजी थेट रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत ‘आहे आणि त्यामुळे या पाण्यामुळे एखादे वाहन घसरून होऊन अपघात होण्याची शक्यता आहे.

या निकृष्ट कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनी यांच्याकडे तक्रार केली आहे; मात्र त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे हेगिष्टे म्हणाले. १५ ऑगस्टपर्यंत संबंधित ठेकेदार कंपनी आणि बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामकाजाबाबत कार्यवाही न केल्यास ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामस्थांसह लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी अब्दुल्ला मुल्ला, सचिन चाळके, उमेश खानविलकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular