विधानपरिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसु आंदोलकांना फंडिंग बाबत जे वक्तव्य केले तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या प्रामाणिक आंदोलनावर जे आरोप केले. त्याबाबतचा खुलासा करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान मुंबई येथे सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा संघटनेचे नेते सत्यजित चव्हाण, नितीन जठार, नरेंद्र जोशी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
फडवणीस खोटं बोलतात! – राज्याचे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडवणीस हे धांदात खोटं बोलत आहेत. काहीतरी सनसनाटी उडवून देऊन रिफायनरी विरोधकांना बदमान करीत आहेत. आम्हाला फंडिंग होत आहे असे ते सांगतात. ग्रीन पीस संस्थेची मदत आहे, असे म्हणाले. तुमच्याकडे गृहखाते आहे ना? हे जर खरं असेल तर पुरावे सादर करा. नाहीतर माफी मागा अशी मागणी चव्हाण यांनी या वेळी केली.
गैरसमज पसरविणारे भाषण – चव्हाण पुढे म्हणाले काल विधान परिषदेत फडणवीस यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे जे आहेत. ते लोकांत गैरसमज पसरविणारे आणि बदनाम करणारे आहेत. आम्हला गावातील लोकांकडून दोनशे आणि तीनशे रुपये वर्गणी मिळते, त्यामुळे हे आंदोलन चालले आहे. याची माहिती फडवणीस यांनी घ्यावी. सत्य काय आहे ते लोकांना सांगावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
संपूर्ण कोकण पाठीशी – मागील आंदोलन जे झाले त्यावेळी कोकणी माणसात उठाव किती झाला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. सोशल मीडिया पेटला होता आम्हाला सगळीकडून पाठिंबा मिळत आहे. त्यावेळी बारसू आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला. तिथे ५ हजार लोकांनी आंदोलन केले. त्यांना खूप त्रास दिला, गुन्हे दाखल न केले. अजूनही त्रास दिला जात आहे. आझाद मैदानात आंदोलन झाले त्यावेळी ६ हजार लोक उपस्थित होते. ही नुसती झलक आहे. तरी सुद्धा फडवणीस म्हणतात की रिफायनरीला कमी लोकांचा विरोध आहे अस म्हणता मग बारसूच्या आंदोलनात ५ हजार पोलिसांचा फौजफाट कशा साठी आणला होता? बारसूत रिफायनरी होणार असं फडवणीस वारंवार म्हणतात. पण आम्ही बारसूत रिफायनरी होऊच देणार नाही असे प्रतिआव्हान या वेळी चव्हाण यांनी दिले.
खाजगी कंपनी हा राजकीय मुद्दा – विरोधामुळे बारसू रिफायनरीला मदत करणारी खाजगी कंपनी पाकिस्तानात गेली असं सांगून मोठं नुकसान झालं असं ते भासवितात. ती कंपनी फार मोठी आहे. जगात ती अजून खूप कंपन्या करू शकते. तीच हवी असेल तर तिची मदत गुजरातला घ्या. पण तो त्यांचा राजकीय मुद्दा आहे. त्यामुळे त्यांना हिंदूंची मते मि ळतील असं वाटत असावं. पण त्यांनी रिफायनरी करण्याचा हट्ट केला तर कोकणी माणूस यांना मतदान करणार नाही असा दावा चव्हाण यांनी केला.
कोकणी वस्तीत प्रचार करु – या पुढे आम्ही जेजे रिफायनरीला पाठिंबा देणार आहेत त्यां पक्षाला मतदान करू नका, असे कोकण व मुंबईतील कोकणी वस्तीत जाऊन सांगणार आहोत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला मतदान करायचे नाही, असे आमचे आवाहन असेल. बारसू रिफायनरी झाली तर बारसू परिसरात लाखो कोटी रुपयांचे छोटे मोठे पेट्रो केमिकल कारखाने येणार आहेत. त्यामुळे कोकणात मोठं प्रदूषण होऊन नुकसान होईल, हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न असेल. विरोधी पक्षांचा आम्हाला पाठिंबा मिळत असून अधिवेशनात अनेक आमदारांनी समर्थन दिले आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला नितीन जठार आणि नरेंद्र जोशी यांनीही संबोधित केले आणि विविध मुद्दे मांडले.