25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriबागेश्री कासव बंगालच्या उपसागरात स्थिरावले

बागेश्री कासव बंगालच्या उपसागरात स्थिरावले

फेब्रुवारी २०२३ मध्ये दुसऱ्या टप्प्यात दोन कासवांना टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आले.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या अभ्यासासाठी टप्पा दोनमध्ये बागेश्री आणि गुहा ही दोन कासवं टॅगिंग करून सोडण्यात आली होती. त्यातील बागेश्री कासव गेले आठवडाभर बंगालच्या उपसागरात स्थिरावले असून, गुहा थोडेसे केरळच्या दिशेने सरकले आहे. खाद्य मिळत असल्यामुळे बागेश्रीने तिथेच पडाव टाकल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत पहिल्या टप्प्यात कासवं सॅटेलाइट टॅगिंग करून सोडण्यात आली होती; मात्र सहा महिन्यांतच ती सर्व संपर्काबाहेर गेली. त्यामुळे अपेक्षित निरीक्षण नोंदवता आले नाही.

फेब्रुवारी २०२३ मध्ये दुसऱ्या टप्प्यात दोन कासवांना टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आले. त्यांना जोडण्यात आलेले ट्रान्समीटर उच्च दर्जाचे असल्यामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ झाला तरीही दोन्ही कासवांचा संपर्क तुटलेला नाही. बागेश्री कासव सध्या बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या ईशान्य किनाऱ्याजवळील पाण्यात स्थिरावलेले आहे. मागील आठवडाभर ते याच ठिकाणी आहे. या परिसरात खाद्य मिळत असल्याने बागेश्रीचा पुढील प्रवास थांबलेला असावा, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.

बागेश्री अंडी घालण्यासाठी पुन्हा कोकण किनारपट्टीवर येणार की, एकदा अंडी घातल्यानंतर ते पुन्हा अंडी घालत नाहीत, याचे निरीक्षण या निमित्ताने अभ्यासकांकडून केले जात आहे. या प्रकल्पावर संशोधक डॉ. सुरेशकुमार हे लक्ष ठेवून आहेत. दर आठवड्याला टॅगिंग केलेल्या कासवांच्या प्रवासाची माहिती कांदळवन कक्षाकडून प्रसारित केली जाते. त्यानुसार गुहा कासव केरळ किनाऱ्यापासून थोडे उत्तरेकडे वळले आहे. गुहागर येथून गुहाचा प्रवास सुरू झाल्यानंतर ते केरळच्यादरम्यान फिरत राहिले आहे. कदाचित ते पुन्हा अंडी घालण्यासाठी कोकण किनारपट्टीवरच जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular