25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriबाळ माने आमची विचारधारा सोडून गेले, त्यांना भाजपचा आतून, बाहेरून, कुठूनही पाठिंबा नाही!

बाळ माने आमची विचारधारा सोडून गेले, त्यांना भाजपचा आतून, बाहेरून, कुठूनही पाठिंबा नाही!

ना. उदय सामंत यांच्या मताधिक्‌यात मोठी वाढ होणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.

बाळ माने हे आमच्या विचारधारे विरोधात गेले आहेत. आमच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या बाळ माने यांनी फेक नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मला भाजपचा पाठींबा आहे; ते मला आतून सपोर्ट करणार आहेत, असे चुकीचे नरेटीव्ह पसरवले जात आहे. मात्र भाजपचे पदाधिकारी हा गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यात गावागावात फिरत आहेत. ते आमच्या विचारधारेच्या विरोधात असल्याने त्यांना विरोध करणे हे आमचे काम आहे, असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी सांगितले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात गेलेले माजी आ. बाळ माने हे फेक नरेटीव्ह पसरवत आहेत. भाजपचा मला आतून पाठींबा आहे, असे सांगून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला अॅड. बाबा परुळेकर, अॅड. विलास पाटणे; अॅड. दीपक पटवर्धन, श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, भाजपचे शहराध्यक्ष राजन फाळके, उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

ते विचारधारेविरोधात – यावेळी बोलताना अॅड. बाबा परुळेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. बाळ माने भाजपमध्ये असताना आम्ही त्यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. मात्र उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. ते पक्षाच्या विचारधारेविरोधात गेले आहेत. त्यामुळे त्यांना पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही महायुतीचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांचा अपप्रचार – राज्यात भारतीय जनता पार्टीविरोधात अपप्रचार सुरू आहे. भारतीय जनता पार्टी घटना बदलणार असल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीकडून सुरू आहे. कोणतेही सरकार संविधानापेक्षा मोठे नाही. त्यामुळे सरकार कोणाचेही असो, त्यामुळे संविधान बदलले जाणार नाही हे निश्चित आहे. निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही असा विश्वासदेखील यावेळी अॅड. दिपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.

आम्हाला पक्षादेश आलाय ! – राज्यात महायुती म्हणून निवडणूक लढली जात आहे. आम्हाला पक्षादेश आला असून रत्नागिरी विधानसभेसह जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे काम करत असून येथे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पाठिशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. विलास पाटणे, अॅड. बाबासाहेब परूळेकर, अॅड. दीपक पटवर्धन, श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, भाजपचे शहराध्यक्ष राजन फाळके यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठाकरेंची दुटप्पी भूमिका – यावेळी बोलताना अॅड. विलास पाटणे म्हणाले की, नाणार येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर बारसू येथे रिफायनरी आणावी असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. त्यावेळीही स्थानिकांचा विरोध होताच, परंतु आता मतांच्या राजकारणासाठी बारसू रिफायनरी सत्ता आल्यानंतर रद्द करू, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. त्यांची ही दुटप्पी भूमि का आहे. त्यांच्या बदलत्या भूमिका जनतेसमोर आल्या आहेत. त्यामुळे जनता महायुतीसोबतच राहील असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महायुतीचा प्रचार सुरू – रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत निवडणूक रिंगणात आहेत. तर राजापुरातून किरण सामंत, चिपळूण- संगमेश्वरमधून आमदार शेखर निकम यांच्या प्रचाराचे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. रत्नागिरी विधानसभेत जिल्हा परिषद गटनिहाय प्रचारामध्ये कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. त्यामुळे ना. उदय सामंत यांच्या मताधिक्‌यात मोठी वाढ होणार असल्याचा दावा भाजपच्या या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.

RELATED ARTICLES

Most Popular