25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRajapurराजापुरात अपक्षांमुळे लढत रंगतदार, मतांचे ध्रुवीकरण

राजापुरात अपक्षांमुळे लढत रंगतदार, मतांचे ध्रुवीकरण

दोन्हीकडून जोरदार प्रचारयंत्रणा राबवून विजयाची मोर्चेबांधणी केली जात आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी शड्डू ठोकला आहे. गतवेळी प्रमुख विरोधक राहून साळवी यांच्याविरोधात पराभूत झालेले अविनाश लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे. त्याचवेळी यापूर्वी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे संजय यादवराव यांनीही यावेळी कोकण विकास आणि स्थानिक मुद्दा उचलून धरत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारांकडून होणाऱ्या संभाव्य मतांच्या ध्रुवीकरणाने महाविकास आघाडीचे साळवी विरुद्ध महायुतीचे सामंत यांच्यातील तुल्यबळ लढत रंगतदार होणार आहे. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार राजन साळवी, महायुतीचे उमेदवार किरण सामंत, अपक्ष उमेदवार अविनाश लाड, संजय यादवराव यांच्यासह अन्य उमेदवारांनी रिंगणामध्ये शड्डू ठोकला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या तीन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते, समर्थक पायाला भिंगरी लावून मतदारसंघातील वाडीवस्ती पिंजून काढताना दिसत आहेत. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघावर गेली तीन टर्म शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यातून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार साळवी यांच्यासमोर महायुतीतर्फे उमेदवार प्रथमच रिंगणात उतरलेले सामंत यांनी आव्हान निर्माण केले आहे. या मतदारसंघामध्ये साळवी विरुद्ध सामंत अशी तुल्यबळ लढत होत आहे. दोन्हीकडून जोरदार प्रचारयंत्रणा राबवून विजयाची मोर्चेबांधणी केली जात आहे; मात्र या लढतीमध्ये अपक्षांनी ठोकलेल्या शड्डूने चुरस निर्माण झाली आहे.

संजय यादवराव आता अपक्ष – २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपतर्फे निवडणूक लढवणारे यादवराव यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यावेळी त्यांना ९ हजार ९५३ एवढी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यादवराव यांनी कोकणच्या रखडलेल्या विकासावर सातत्याने शेतकऱ्यांसोबत आंदोलने छेडली आहेत. या दोघांसह अन्य अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी, लाड आणि यादवराव हे ताकदवान अपक्ष उमेदवार म्हणून ओळखले जात असून, त्यांनी निर्माण केलेल्या आव्हानामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळणाऱ्या मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फटका कोणाला बसणार, याकडे लक्ष लागले आहे.

२०१९ ला अविनाश लाड यांचे होते आव्हान – महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले लाड यांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढवताना साळवी यांच्यासमोर जोरदार आव्हान निर्माण केले होते. त्यावेळी ते ११ हजार ८७६ मतांनी पराभूत झाले असले तरी, त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. बंडखोरी केल्याने काँग्रेसमधून हकालपट्टी करत त्यांना पाठबळ नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितले जात असले तरी अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यासोबत प्रचारात उतरल्याचे दिसत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular