26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriबाळ माने भाजपला रामराम करून अमृत मुहूर्तावर आज शिवसेनेत ?

बाळ माने भाजपला रामराम करून अमृत मुहूर्तावर आज शिवसेनेत ?

शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

रत्नागिरीचे माजी आ. श्री. बाळासाहेब माने हे बुध. दि. २३ ऑक्टो. रोजी दु. १२ वा. ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रत्नागिरी शहर व परिसरात सुरु झाली आहे. आज दुपारनंतर राजकीय घडाम ोडींना वेग आला व सायंकाळपासून रत्नागिरीत जोरदार चर्चा सुरु झाली.

अमृत मुहूर्तावर प्रवेश? – रत्नागिरीचे माजी आ. श्री. बाळासाहेब माने बुध. दि. २३ ऑक्टो. रोजी दु. १२ वा. अमृत मुहूर्तावर ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा साऱ्या रत्नागिरी व शहर परिसरात सायंकाळपासून सुरु झाली आहे.

नेते मातोश्रीवर – मात्र या वृत्ताला श्री. बाळासाहेब माने यांच्या गोटातून कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. असे असले तरी आज रत्नागिरीतील शिवसेना ठाकरे गटाची ज्येष्ठ नेते मंडळी ‘मातोश्री’वर जाऊन श्री. उद्धव ठाकरे यांना भेटली. रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत यावेळी चर्चा झाली.

ज्येष्ठ नेते उपस्थित – मंगळ, दि. २२ ऑक्टो. रोजी मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख श्री. विलास चाळके, सह संपर्क प्रमुख श्री. राजेंद्र महाडीक, माजी जि. प. उपाध्यक्ष श्री. उदय बने, तालुका प्रमुख श्री, बंड्या साळवी यांच्यासह १० विभाग प्रमुख व शहर प्रमुख उपस्थित होते.

एकमुखी होकार ! – पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकेक करुन केबिनमध्ये बोलावून चर्चा केली. त्यानंतर सर्व विभाग प्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी ‘मी देईन त्या उमेदवाराला निवडून देणार ना?’ असा प्रश्न श्री. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतून आलेल्या पदाधिकाऱ्यांना विचारला व. सर्वांनी एकमुखाने होकार दिला.

भाजपला रामराम? – पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. मात्र भाजपचे माजी आ. श्री. बाळासाहेब माने यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी निष्ठावंत सहकाऱ्यांची मते श्री. उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली असावीत असे याबाबत मत व्यक्त करण्यात आले. श्री. बाळासाहेब माने खरोखर भाजपला ‘जय श्रीराम’ करतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular