माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची ज्या चिन्हावर सुरुवात झाली त्या धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची मला संधी मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो असे माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा कुडाळमध्ये होत असून याच कार्यक्रमात आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. माझा शिवसेना प्रवेश निश्चित झाला असून उद्या बुधवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथे शिवसेना नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपण शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. यावेळी पक्षप्रवेशाची सभा होणारं आहे. सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. कुडाळ मध्ये आतापर्यंत झाला नसेल एवढा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम असेल.
खा. नारायण राणे यांची राजकीय सुरूवात ज्या शिवसेना पक्षातून व धनुष्यबाण चिन्हावर झाली, त्या पक्षात आणि त्या चिन्हावर आपल्याला काम करण्याची संधी मिळत आहे, याचा आपल्याला खूप आनंद आहे. भाजप पक्ष व नेत्यांनी आपल्याला खूप आदर, प्रेम दिले. जरी शिवसेनेत प्रवेश करीत असलो तरी, भाजपाशी आपले तसेच जिवाभावाचे संबंध राहतील. कुडाळ मालवण विधानसभा निवडणुक जिंकायची हेच आमचे टार्गेट आहे. हा मतदारसंघ संघ महाराष्ट्र राज्यात टॉप ५ मध्ये आणण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे, अशी माहीती भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे दिली. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक राणे व राकेश कांदे उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, सन २०१९ मध्ये खा. नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्यासोबत आणि आमच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षात आलो.
भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर खूप रिस्पेक्ट मिळाला. सर्व नेत्यांनी खूप रिस्पेक्ट दिला. खूप आदर दिला, खूप प्रेम दिले आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची जी शिस्त आहे ती शिकायला मिळाली, ती जवळून बघितली. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर एका लहान भावाप्रमाणे मला सांभाळलं. काही मध्ये मध्ये ज्या काय अडचणी आल्या, त्यामधून मला बाहेर काढले. पक्षांमध्ये एक स्थान दिले तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील व अन्य सर्वच नेत्यांनी प्रेम, आदर दिला. माझे जीवाभावाचे संबंध भाजप पक्षात आहेत आणि पुढेही राहतील. माझी इतक्या वर्षाच्या या राजकारणामध्ये जेव्हापासून सुरुवात झाली, तेव्हापासून’ खा. नारायण राणे यांच्या सावलीमध्ये राहीलो आणि यापुढेही तसाच राहणार आहे, असे श्री. राणे म्हणाले.
दि. २३ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील काही सहकारी यांच्या उपस्थितीत येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर माझा शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. यावेळी सभाही होणार आहे. माझा शिवसेना प्रवेश निश्चित झाला सायं. ४ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील काही सहकारी यांच्या उपस्थितीत येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर माझा शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. यावेळी सभाही होणार आहे. माझा शिवसेना प्रवेश निश्चित झाला असून तो उद्या होत आहे, याबद्दल आपण मुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला माझ्या प्रेमापोटी कार्यकर्ते आणि लोक येणार आहेत. भव्यदिव्य असा हा कार्यक्रम होईल, असे ते म्हणाले.