गुंडांना सोबत घेऊन हुकुमशाहीच्या आधारे आयारामांची मंदिरे बांधत सुटलेल्या भाजपला कायमचे तडीपार करावे, कोकणातील पाणबुडी, मुंबईचे डायमंड मार्केट, एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रातील ४० गद्दार देखील गुजरातला पळवले. एवढेच नव्हे तर काँग्रेसच्या काळातील सरकारी योजना देखील पळविण्याचे काम हे सरकार करीत आहे. पंतप्रधान स्वनिधी फंडात कोट्यावधीचा निधी या ना त्या मागनि जमा होत आहे. या फंडात मोठा घोटाळा असून त्याचा हिशेब आधी जनतेला द्या. त्यानंतरच ईडीच्या कारवाया करा, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यानी केले. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जनसंवाद जाहीर सभेत उद्धव ठाकरे उद्धव म्हणाले, शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकीतच संपविण्याचा डाव होता.
तेव्हा पक्षप्रमुख म्हणून आपला पाठिंबा घेतला होता. पाठिंबा का चालला, त्यावेळी पंतप्रधानांना दिलेल्या पाठिंबा पत्रावर पक्षप्रमुख म्हणून आपली सही कशी चालली. २०१८ साली युती तुटली तेव्हा मातोश्रीवर भाजप का आला होता. शिंदे गटाकडे का गेला नाहीत. घराणेशाहीविषयी आमच्यावर बोट ठेवणारा माणूस आधी घरंदाज आहे का हेही तपासायला हवे. युती काळात असलेल्याचे संधीचे सोने करण्याऐवजी माती केलीत. आता बाळासाहेबांना चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सत्तेच्या न्यायालयापेक्षा जनतेचे न्यायालय मोठे आहे. आज माझ्या हाती द्यायला काही नसताना माझ्या सोबत जो जनसागर ठामपणे उभा आहे. त्यावरूनच जनतेचा विश्वास लक्षात येतो. त्याच्यासारखे भाड्याने कार्यकर्ते आणण्याची वेळ अजून आपल्यावर आलेली नाही. प्रत्येक मतदारसंघात प्रचारसभा
खेड – येथील रेल्वे स्थानकात सोमवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याचे आगमन झाले. येथे हजारो कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी कार्यकत्यांसोबत खेड रेल्वे स्थानक परिसरात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. कोकणातील प्रत्येक मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहे. गद्दार लोकांना धडा शिकवण्यासाठी तयार रहा. संघटन बांधण्यासाठी मशाल घेऊन कामाला लागा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर ते वंदे भारत ट्रेनमधून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले.