26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiri१३ बांगलादेशींना पकडले दहशतवादी पथकांची नाखरेत कारवाई

१३ बांगलादेशींना पकडले दहशतवादी पथकांची नाखरेत कारवाई

चिरेखाणीवर अवैधरीत्या वास्तव्य करत असल्याचे दिसल्याने त्यांच्यावर कारवाई केलल्याचे पोलिसांनी सांगितले.

तालुक्यातील नाखरे- कालकरकॉड भागात चिरेखाणीवर बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी पहाटेच्या सुमारास जेरबंद केले. या घुसखोरांवर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने आज पहाटे पावणेचारच्या सुमारास कारवाई केली. कोलकात्याहून हे बांगलादेशी आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी शाखा रत्नागिरी येथील सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलिस अंमलदार उदय चांदणे, महेश गुरव, रत्नाकांत शिंदे, विजय कदम यांनी ही कारवाई केली. हे बांगलादेशी नागरिक जून २०२४ पासून आसिफ सावकार (पावस बाजारपेठ) यांच्या कालकरकोंड येथील चिरेखाणीवर कामाला होते. ही घटना मंगळवारी (ता. १२) पहाटे कालकरकोंड येथे निदर्शनास आली. यामध्ये पकडलेले बांगला देशी नागरिकांची नावे अशी.

वहीद रियाज सरदार (वय ३५), रिजाऊल हुसेन करीकर (५०), शरिफुल हौजीआर सरदार (२८), फारूख मंहमद जहीरअली मुल्ला (५०), हमिद मुस्तफा मुल्ला (४५), राजू अहमद हजरतअली शेख (३१), बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार (२९), सैदुर रेहमान मोबारक अली (२०), आलमगिर हुसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (३४), मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार (३२), मोहम्मद नुरूझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (३८), मोहम्मद नूरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार (४५), मोहम्मद लालटू मोंडल, सन ऑफ किताब अली (३७). हे सर्वजण आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ) यांच्या चिरेखणीवर नाखरे कालरकोंडवाडी यांच्याकडे राहत होते. दरम्यान, याप्रकरणी १३ जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लेखी परवानगी शिवाय प्रवेश – तेरा बांगला देशी नागरिक असून, ते जून २०२४ पासून आजपर्यंत कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत होते. भारत-बांगला देश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरीत्या प्रवेश केला. नाखरे ग्रामपंचायत हद्दीतील कालकरकोंडवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथे आसिफ सावकार (पावस, बाजारपेठ) यांच्या चिरेखाणीवर अवैधरीत्या वास्तव्य करत असल्याचे दिसल्याने त्यांच्यावर कारवाई केलल्याचे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीही सापडला होता चिरेखाणीवर गुन्हेगार – रत्नागिरी तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवर दोन वर्षांपूर्वी खुनाच्या प्रकरणातील पसार संशयित अनेक दिवस काम करत होता. त्याला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पकडले होते.

RELATED ARTICLES

Most Popular