21.5 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriमिऱ्या किनार्यावरील बसरा जहाज अखेर स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय

मिऱ्या किनार्यावरील बसरा जहाज अखेर स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय

किनारा मोकळा करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

मागील साधारण दोन वर्षापासून मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाज, निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. ते आता स्क्रॅप करून किनारा मोकळा करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या ३ जूनला हे जहाज किनाऱ्यावर अडकून दोन वर्षे पूर्ण होतील. तरी या जहाजाच्या एजन्सीने ते काढण्याच्या दृष्टीने अपेक्षित पुढाकार न घेतल्याने ही प्रक्रिया लांबली. आता भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीच्या काही परवानग्या घेऊन हे जहाज भंगारात काढले जाणार आहे. येत्या काहीच दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

स्थानिक उद्योजकांनी हे जहाज भंगारात काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या ३ जूनला हे जहाज अडकून दोन वर्षे पूर्ण होतील. तरी या जहाजाच्या एजन्सीने ते काढण्याच्यादृष्टीने अपेक्षित पुढाकार न घेतल्याने ही प्रक्रिया लांबली. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी अडकलेले बसरा स्टार जहाज स्क्रॅप करून किनारा मोकळा करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

बसरा स्टार नावाचे हे तेलवाहू जहाज तांत्रिक बिघाडामुळे मिरकरवाड्यापासून काही अंतरावर नांगरून ठेवले होते. परंतु, नेमके त्याच दरम्यान निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकलेले, त्याचा तडाखा बसून जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी लागले होते. त्यावेळी जहाजावरील कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक आपत्ती यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले;  मात्र जहाजामधील ऑईलगळती होऊन किनार्‍याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला नोटीस बजावली होती.

मिर्‍या किनाऱ्यावर रुतलेले हे जहाज दगडी धूपप्रतिबंधक बंधार्‍यावर सतत आपटून त्याचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले. किनारा सुरक्षिततेच्या दृष्टीने जहाज काढा, स्क्रॅप करा पण काहीतरी निर्णय घ्या, असा अल्टीमेटम प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांनी जहाज एजन्सीला दिला आहे; मात्र संबंधित एजन्सीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परंतु,  दोन वर्षे व्हायला आली तरी त्याला जहाज एजन्सीकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आणि पावसाळी वातावरणामुळे जहाज भंगारात काढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मेरीटाईम बोर्डाने प्रस्ताव सादर केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular