मागील वर्षी आलेल्या निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. पाऊस आणि वाऱ्याच्या तुफानी वेगाने बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज भरकटत रत्नागिरीतील मिऱ्या गावामधील किनारपट्टी येऊन आदळले. २०२१ चे दुसरे वादळ येण गेले तरी अजून त्या जहाजाबाद्द्ल कोणी काहीच कारवाई केलेली नाही. अजूनही ते जहाज मिऱ्याच्या समुद्राकीनारीच लाटांचा मारा सहन करत उभे आहे. या जूनमध्ये ते जहाज या समुद्रकिनारी लागून वर्ष पूर्ण होईल.
हे जहाज मागील वर्षी साउथ आफ्रिकेमधून दुबईला रवाना झाले होते, परंतु, वादळामुळे त्यांची दिशा बदलल्याने ते कोकण किनारपट्टीवर येऊन थडकले. मेरीटाइम बोर्डाकडून वारंवार जहाजाच्या मालकाशी पत्रव्यवहार केला जात असून अद्याप कोणतेही सकारात्मक उत्तर प्राप्त झालेले नाही. जहाजवर असणार्या १३ खलाश्यांचा पोलीस तटरक्षक दलाच्या मदतीने वाचविण्यात आले होते.
जहाज किनार्यावरून काढण्यासंबंधी मेरिटाइम बोर्ड सतत प्रयत्नशील असून, वेळोवेळी तेथील दुतावासंशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. परंतु, कोरोन महामारीचा दणका इथेही मिळाला आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रमाणामुळे दुबई दूतावास बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जहाज किनार पट्टीवरून काढण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे मेरीटाइम बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. जरी समोरून योग्य तो प्रतिसाद मिळत नसला तरी हर तर्हेने प्रयत्न करणे सुरु आहे.
किनारपट्टीच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे जहाज मिऱ्या किनारपट्टीवरून हलवणे गरजेचे असल्याचे मेरीटाइम बोर्डाकडून सांगण्यात येत आहे आणि त्यापरीने आमचे संबंधित शासनाशी आणि जहाज मालकाशी सुरु आहेत.