31.1 C
Ratnagiri
Friday, April 19, 2024

सूर्यकुमार यादवचे नंबर 1 स्थान धोक्यात, पाकिस्तानी फलंदाज जिंकू शकतात

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या...

मुंबईत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाडयामुळे होणारी...

चिपळुणात नारायण राणेंचा दोन दिवस मुक्काम

महायुतीच्या मेळाव्या निमित्ताने चिपळूणमध्ये आलेले केंद्रीय मंत्री...
HomeSportsबीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी

रॉजर बिन्नी हे १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य आहेत.

बीसीसीआयच्या मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड करणात आली. मुंबईत बीसीसीआयच्या ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बीसीसीआयच्या नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात जय शहा यांनी बीसीसीआय सचिव पदाची दुसरी टर्म देण्यात आली. तर भाजप नेते आशिष शेलारांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष असतील. तर देवाजीत सैकिया हे संयुक्त सचिव असतील.

रॉजर बिन्नी हे १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य आहेत. त्यांनी बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष म्हणून आज अधिकृतरित्या सूत्रे हातात घेतली. रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्या घेतल्या आपण प्रामुख्याने दोन कामे करणार असल्याचे सांगितले.

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी बोलताना म्हणाले की,  बीसीसीआय अध्यक्ष म्हणून मी दोन गोष्टींना प्राधान्य देणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी खेळाडूंना दुखापत कशी होणार नाही हे पाहणार आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने त्याचा फटका वर्ल्डकपच्या सर्व रणनितीवर पडला. दुसरी गोष्ट म्हणजे मी देशातील खेळपट्ट्यांवर देखील लक्ष केंद्रीत करणार आहे. जेणेकरून भारतीय संघाचे योगदान सर्व दृष्टीने चांगले राहील.

रॉजर बिन्नी यांनी भारताकडून २७ कसोटी आणि ७२ वनडे सामने खेळले आहेत. अष्टपैलू खेळाडू असलेल्या बिन्नी यांनी ४७ कसोटी विकेट्स घेतल्या तर ७७ वनडे विकेट्स आपल्या नावावर केल्या. १९८३ वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज ठरले होते. सौरभ गांगुली यांनी देखील चांगल्या व्यक्तीकडे बीसीसीआय गेली असल्याचे म्हणत शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular