महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम. टीडीसी) प्रस्तावानुसार कोकणातील – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या ४ जिल्ह्यांतील ८ समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकुटी उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील आरे-वारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सेली आणि पालघर जिल्ह्यांतील बोर्डी, केळवा या ८ समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकुटी (बीच शॅक्स) उभारण्यात येणार आहेत. कोकणाच्या सौंदर्यीकरणात सम द्राने मोठी भर घातली आहे. ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीला लाभला आहे. देश विदेशातील पर्यटकांना कोकणची किनारपट्टी भुरळ घालत आली आहे. स्वच्छ सुंदर आणि शांतता पूर्व परिसर हा येथील वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. पर्यटनाच्या दृष्टीने ही किनारपट्टी म हत्त्वाची आहे. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सेली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या ८ ठिकाणी ही योजना अमलात आणली जाणार आहे.

कोकणाला समृध्द किनारपट्टी लाभली आहे. या सागर किनारपट्टीचा पर्यटनात्मक व्यावसायिक वापर करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पर्यटन योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी एमटीडीसीने केली होती. ही योजना राबविताना पर्यावरणाला पूरक सुविधा आणि योजनांचा वापर करण्यात यावा, असे प्रस्तावित करण्यात आले होते. तसेच या सुविधां बरोबर रोजगारांच्या संधीही उपलब्ध करुन देण्यात येणार होती. त्यानुसार कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बीस रॉक्स उभारण्यात येणार आहेत. स्थानिक व्यक्तींना यात ८० टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप केले जाईल. किमान १५ फूटाची लांबी आणि रुंदी तसेच १२. 9 फुट उंचीची ही कुटी असणार आहे. प्रत्येक कुटीमध्ये बसण्यासाठी १५ ते २० फुट छत टाकता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. सकाळी ७. वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत या कुटी सुरू ठेवण्यास मान्यता दिली जाईल.