26 C
Ratnagiri
Sunday, January 18, 2026

किनारपट्टी, गावांच्या संरक्षणासाठी बंधारे कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना

राज्यशासनाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण...

रत्नागिरीत गुन्हेगारांवर आता ‘एआय’ ठेवणार नजर

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक...

समुद्रात मोठे वादळ, प्रतिकूल हवामानामुळे पुरेशी मासळी मिळेना

समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने...
HomeRatnagiriकोंडगावची घंटागाडी सात महिने धूळ खात

कोंडगावची घंटागाडी सात महिने धूळ खात

गेल्या वर्षी जून महिन्यात घंटागाडी ग्रामपंचायतीला देण्यात आली.

कोंडगाव ग्रामपंचायतीला देण्यात आलेली घंटागाडी तब्बल सात महिने जागेवर उभी ठेवण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे. गावात कचऱ्याच्य जागेचा प्रश्न सुटत नसल्यामुळे ही गाडी ग्रामपंचायतीत धूळ खात उभी आहे. कोंडगाव ग्रामपंचायतीला कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने शासनाकडे प्रयत्न केले. त्यामुळे गेल्या वर्षी जून महिन्यात घंटागाडी ग्रामपंचायतीला देण्यात आली. ही गाडी ग्रामपंचायतीस मिळणार म्हणून प्रभारी सरपंच श्रद्धा शेट्ये आणि काही सदस्य कचरा विलगीकरणाची माहिती घेण्यासाठी देवरूख येथे जाऊन आले. देवरूख येथे उभारण्यात आलेल्या ओला आणि सुका कचरा विलगीकरण आणि कचरा व्यवस्थापन केंद्राला त्यांनी भेट देऊन त्या प्रक्रियेची सविस्तर माहिती करून घेतली.

घंटागाडी ग्रामपंचायतीकडे जून महिन्यात सुपूर्द केल्यावर त्याची माहिती सदस्यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना दिली आणि त्यासाठी जागेची गरज ग्रामस्थांपुढे ठेवण्यांत आली. स्वतःच्या ग्रामपंचायतीची मालकीची जागा नाही तसेच देवरहाटीच्या जागेत असा कचरा टाकता येत नसल्यामुळे जागेची समस्या मोठ्या प्रमाणाव्र उभी राहिली. त्यामुळे ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले. कचऱ्याची दुर्गंधी पसरण्याची शक्यता असल्यामुळे ही जागा वस्तीपासून बाहेर असणे आवश्यक होते; पण प्रत्यक्षात अशी जागा आजपर्यंत उपलब्ध झालेली नाही. यावर उपाय म्हणून कचरा घेऊन देवरूखला जाणे, हा पर्यायही ग्रामपंचायतीने विचारात घेतला; पण इंधनखर्च आणि चालकाचा पगार याचा विचार करता एवढा खर्च ग्रामपंचायतीला शक्य नसल्यामुळे हा पर्यायही बाजूला ठेवावा लागला. परिणामी, गेले सात महिने नवी घंटागाडी धूळ खात उभी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular