मुंबई-गोवा महाम ार्गावरील कशेडी घाटातील भोगाव मार्ग धोकादायक स्थितीत आहे. 15 या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. आय. आय.टी. तंत्रज्ञानांकडून उपाययोजना करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. यामुळे चाकरमान्यांना भोगाव मार्गावरून मार्गक्रमण करताना जीवघेणा प्रवास करावा लागणार आहे. कशेडी घाटातील भोगाव मार्ग गतमहिन्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पुरता खचला आहे. गतमहिन्यात सिलिंडर वाहतुकीच्या ट्रकसह फोम बनवणाऱ्या रसायन वाहतुकीचा ट्रक दरीत कोसळला होता.
भोगावनजीक खचलेल्या रस्त्यामुळे मार्ग पूर्णतः धोकादायक राष्ट्रीय महामार्ग खात्याने मार्गाची आय.आय. टी. च्या तंत्रज्ञानांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप उपाययोजनेची पूर्तता झालेली नाही. पोलादपूरपासून केवळ ९ कि. मी. अंतरावर असलेल्या कशेडी घाटालगतचा भाग ‘डेंजरझोन’ मध्येच आहे. यापाठोपाठ कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गही ‘डेंजरझोन’ मध्येआला आहे. यामुळे पर्यायी वाहतुकीस दुसरा पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. मंत्र्यांसह खासदारांकडून खचलेल्या मार्गाची सातत्याने पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या जातात.
मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केले जात आहे. भोगावनजीक अपघातांची मालिका देखील कायमच आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.