25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunजगबुडी नदीवरील भोस्ते पूल कमकुवत

जगबुडी नदीवरील भोस्ते पूल कमकुवत

भागातील ग्रामस्थ शहरात येण्याकरिता येथूनच ये-जा करतात.

दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकल्यामुळे भोस्ते जगबुडी पूलच्या वाहतुकीस धोकादायक झाला आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल कमकुवत झाला असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांचा जीव टांगणीवर गेला आहे. भोस्ते जगबुडी पुलावरून पादचाऱ्यांसह वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. वेळेच्या बचतीसाठी सर्वच वाहनांना भोस्ते पूल वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरतो. रेल्वेस्थानकात ये-जा करण्यासाठी वाहनचालक या पुलाचा वापर करतात. भोस्ते, अलसुरे, कोंडिवली, निळीक आदी भागातील ग्रामस्थ शहरात येण्याकरिता येथूनच ये-जा करतात. चार वर्षांपूर्वी पुलाच्या एका बाजूला मध्यभागी तडा गेला होता.

त्यामुळे पुलाची सुरक्षितता ऐरणीवर आली होती. याबाबत नागरिकांनीही तक्रारी केल्या होत्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दोन्ही बाजूला तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करत दुरुस्तीचे सोपस्कार पार पाडले होते. पूल दुरुस्तीचा प्रस्तावही मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवला होता; मात्र पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे. धोकादायक भोस्ते पुलाच्या डागडुजीसाठी काँग्रेस पक्षासह विविध स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही पदरी निराशाच पडली आहे. नगर प्रशासनाने भोस्ते पुलावरून अवजड वाहतुकीस मज्जाव करत तसा सूचनाफलकही पुलाजवळ लावला होता.

दंडात्मक कारवाईची दमदेखील अवजड वाहनचालकांना दिला होता; मात्र तरी देखील या तंबीला न जुमानता भोस्ते जगबुडी पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. अशा अवजड वाहनामुळे हा पूल आणखीन कमकुवत बनत आहे. यावरून दररोज ये-जा करणाऱ्या हजारो वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. भागातील वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी सर्वचदृष्टीने सोयीस्कर ठरणाऱ्या भोस्ते जगबुडी पुलाच्या दुरुस्तीचे घोंगडे भिजत पडल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular