27 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

iPhone 16 मालिका विक्री सुरू, 5000 रुपयांची झटपट सूट…

Apple iPhone 16 मालिका अधिकृतपणे आजपासून म्हणजेच...

ऋषभ पंतने एमएस धोनीला बांगलादेशविरुद्ध केलेल्या कारवाईची आठवण करून दिली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना...
HomeKhedभोस्ते घाट अपघात प्रकरणी, मद्यधुंद चालक ताब्यात

भोस्ते घाट अपघात प्रकरणी, मद्यधुंद चालक ताब्यात

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र महामार्गांची, अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यामुळे वाहन चालक सुद्धा संयम राखून गाडी चालवताना दिसत आहेत. मात्र त्याला काही अपवाद ठरतात.

भोस्ते घाटामध्ये एका कारने दुचाकीला दिलेल्या जबरदस्त धडकेमुळे त्यावर असणारे दोन स्वार दूरवर गेकले गेले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथून संगमेश्वर येथे भाडे सोडण्यासाठी आलेला मारुती कार चालक हा आज सकाळी परत जात असताना, सकाळीच मद्यपान करून निघाला होता. ड्रिंक एन्ड ड्राईव्ह हा कायद्याने गुन्हा असून तरी हा चालक त्याच अवस्थेत गाडी चालवत होता.

हा चालक महामार्गावरील भोस्ते घाट येथे आला असता त्याचा आपल्या कारवरील ताबा सुटला आणि त्याने कारच्या पुढे असलेल्या दुचाकीला मागून जोरात धडक मारली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दोघेही रस्त्यावर लांब फेकले गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील भोस्ते घाटात घडला. खेड पोलिसांनी त्वरित कारवाई करत मद्यधुंद कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाने एवढे मद्यपान केले होते कि, त्याला धड उभेही राहता येत नव्हते. खेड पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी तपास सुरु केला आहे. अपघातात जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. मात्र ते दोघेही मंडणगड तालुक्यातील केळशी येथे राहत असल्याचे समजते.

RELATED ARTICLES

Most Popular